Aapale Sarkar Seva Kendra Arj | आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरू

Aapale Sarkar Seva Kendra Arj सुरु करा आपले सरकार सेवा केंद्र बुलढाणा जिल्ह्यात थेट 544 जागां साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू…..

नवीन आपले सरकार सेवा केंद्र वाटपासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 552 जागा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले तर आज या पोस्टच्या माध्यमातून कसा करायचा? याच्यासाठी अटी शर्ती काय? कागदपत्र काय लागणार आहेत आणि नेमका कधी करायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या अगोदर आपण वेळोवेळी ज्या जिल्ह्यांसाठी अर्ज निघतात, त्यावेळी अशा नवीन अपडेट घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे आता बुलढाणा जिल्ह्याची जाहिरात सुद्धा 24 फेब्रुवारी 2020 रोजी काढण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज करण्याची तारीख :

हे अर्ज 7 मार्च 2022 पासून 19 मार्च 2022 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. त्याच्या पूर्वीच्या अर्जाने यांच्यानंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. जिल्ह्यात आजरोजी 645 आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत आहेत. लोकसंख्या लक्षात घेता ही केंद्रे अपुरी पडत असल्यामुळे जिल्ह्यात आणखी 554 नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. याबाबत आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. जे उमेदवार अर्ज भरण्यास इच्छुक असतील त्यांनी www.buldhana.nic.in या संकेत स्थळावर जाऊन जाहिरातीत दिलेल्या विहीत कालावधीमध्ये ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी केले. 7 मार्च 2022 पूर्वीचे व दिनांक 19 मार्च 2022 नंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे.

Read  How To Check Land Map In Maharashtra Online 2023 | जमिनीचा नकाशा पहा आत्ता मोबाईल वर २०२३.

कोणत्या तालुक्यासाठी किती जागा आहेत?

बुलढाणा तालुक्यासाठी 46 याप्रमाणे चिखली तालुक्यासाठी एकंदरीत 55, देऊळगावराजासाठी 29, जळगाव जामोदसाठी 29, खावंसाठी 71 त्याप्रमाणे लोणारसाठी 29 आणि मलकापूर तालुक्यासाठी 28, आणि मलकापूर तालुक्यासाठी 28 एकूण तालुक्यासाठी एकूण 49 आणि मोताळा तालुक्यासाठी 38 याप्रमाणे नांदुरा तालुक्यासाठी आपण पाहिलं होतं 43 अर्ज संग्रामपूर तालुक्यासाठी 37 जागा भरल्या जाणार आहेत आणि शेगाव 38 रिक्त जागांसाठी तर सिंदखेडराजा या तालुक्यासाठी एकूण 62 असे एकूण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी 554 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहे.

ऑनलाईन अर्जासाठी अटी व शर्ती कोणकोणते आहेत ते आपण पाहूया.

उमेदवार हा CSC-SPV केंद्रधारक असावा. किंवा किमान CSC-SPV केंद्र धारण करण्यासाठी पात्र असावा.

CSC-SPV उमेदवाराने ज्या गावासाठी अर्ज केला आहे, त्या गावांमध्ये वार्डामध्ये या गावासाठी अर्ज केलेला आहे. या गावांमध्ये वार्डामध्ये सीएससी केंद्र असणे बंधनकारक आहे.

त्याचप्रमाणे जर जास्त अर्ज उपलब्ध झाले असते त्याच्यामध्ये सीएससी धारकाला महत्व किंवा प्राधान्य दिले जाणार आहे.

एका उमेदवाराला एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाही. असे झाले तर ते ग्राह्य धरले जाणार नाही किंवा एखाद्या केंद्रकरता एकापेक्षा जास्त अर्ज आले तर त्याच्यामध्ये सीएससी सेंटर असतील त्यांचे मागील दोन वर्षेचे ट्रांजेक्शन विचारात घेता त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

Read  अतिवृष्टी मदत पहा कोणाला मिळेल निघाला जी आर नियम व अटी जाणून घ्या

उमेदवाराकडे शॉप ॲक्ट लायसन किंवा ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे.

उमेदवाराकडे शंभर स्क्वेअर फूट जागा असावी.

उमेदवाराचे चारित्र्य संबंधित पोलिस स्टेशनच पडताळणी प्रमाणपत्र असाव.

केंद्र मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा दबाव आणण्याचा निदर्शनास आल्यास असे अर्ज बाद केले जातील.

वेळोवेळी दिलेल्या सूचना जा आहेत त्या buldhana.nic.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येते.

त्यानुसार कारवाई करण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अटी शर्ती याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत.

त्यानंतर मी नियम गोपनीयता धोरण वाचली आहेत आणि मी त्याच्याशी सहमत आहे. अशी संमती देऊन आपल्याला एक प्रोसिजर करायची आहे असे प्रोसिजर केल्यानंतर आपल्या समोर एक अर्ज येईल.

अर्जामध्ये आपण पाहू शकता, अर्जदाराचे नाव अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, अर्जदाराचा पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी.

यानंतर जिल्ह्यामध्ये बुलढाणा सिलेक्ट करायचं याच्यानंतर आपण ज्या तालुक्यासाठी अर्ज करणार आहोत तो तालुका सिलेक्ट करायचा आहे.

नंतर तुमच्या समोर सेंटरची लिस्ट येईल ती लिस्ट सिलेक्ट करायची आहे.

शिक्षण काय झालेले आहे, कॉम्प्युटर शिक्षण काय झाले आहे. स्वत:कडे शंभर स्क्वेअर फुट जागा एका दहा बाय दहाची किंवा भाडेपट्टा पाच वर्षाचा करार असेल, 11 महिन्‍याच्‍या करार असेल जे असेल ते त्याच्यामध्ये भरायचे आहे.

जागेसंबंधित कागदपत्र संबंधित कागदपत्र आपल्याला या ठिकाणी द्यावी लागणार आहेत.

संगणक साहित्यामध्ये आपल्याजवळ काय काय आहेत. कंप्यूटर, स्कॅनर किंवा कोणते साहित्य नाहीत हे आपल्याला या ठिकाणी टीक करायचा आहे.

Read  10 वी निकाल 2023 | Maharashtra10th SSC Board Result 2023

शॉप ॲक्ट लायसन, ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र आहे का? हो असेल तर हो आणि नाही असेल तर नाही. परंतु असं हे याठिकाणी बंधनकारक आहे

आपल्याकडे सीएससी केंद्र आहे का? असेल तर हो नसेल तर नाही आणि असणाऱ्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल.

जेव्हा कागदपत्र पडताळणी करता कार्यालयातून अर्ज केल्यानंतर बोलावले जाईल. त्यावेळेस घेऊन येण्यासाठीची कागदपत्रे या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. ही कागदपत्रे आपल्याला सर्वात प्रथम ऑनलाइन अपलोड करायचे आहे.

त्याच्यामध्ये उमेदवाराचे छायाचित्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे आणि संगणक कार्याचा प्रमाणपत्र या पाच कागदपत्राच्या आधारे या ठिकाणी जे आहेत ते पडताळणी केली जाते आणि

त्यानंतर पुन्हा शॉप ॲक्ट लायसन, त्या जागेची कागदपत्र, सीएससी वरती झालेल्या व्यवहारांची संख्या हे सर्व लक्षात घेता ते वाटप केले जाईल. त्यावेळेस ते प्राधान्य दिले जाईल.

आणि याच्या नंतर submit आणि pay वर क्लिक करून आपल्याला सबमिट करायचे आहे. या अर्जासाठी जी फी असेल ती आपल्याला या ठिकाणी गेल्यानंतर भरावी लागेल आणि सबमिट केल्यानंतर पुढील कारवाईसाठी आपले अर्ज सबमिट होईल.

तर मित्रांनो अशाप्रकारे ही माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करुन सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment