शेतात जाण्यासाठी निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक,अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू!

खामगाव : शेतात जाण्यासाठी निघालेला कुटुंबातील एकुलत्या एक तरुणाचा मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री खामगाव-मेहकर रोडवरील आवार टोल नाक्याजवळ घडली. तालुक्यातील आवार येथील अक्षय तुळशिराम सातपुते (२३) हा दुचाकीने (क्रमांक एमएच २८-बीएन ५३२३) शेतात हरभरा पिकाची राखण करण्यासाठी जात होता. त्यावेळी टोल नाक्याजवळ रात्री च्या सुमारास अज्ञात चालकाने वाहन भरधाव व … Read more

बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई!

खामगाव :- बंदी असलेल्या घातक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन जणांवर शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी कारवाई करत त्यांच्याकडून ११ रील व नायलॉन मांजा जप्त केला आहे.मकरसंक्रातीचा सण जवळ आल्याने शहरात पतंगबाजीला ऊत आला असून शहरात अनेक ठिकाणी बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होत आहे.दरम्यान शहर पोलिसांनी मोची गल्ली भागात छापा मारुन ११०० रुपयाचा नायलॉन मांजा … Read more

खामगाव शहरात दोन बनावट डॉक्टर जेरबंद! शिवाजीनगर ठाण्याच्या पथकाची कारवाई: बोगस डॉक्टरांचा गोरखधंदा सुरूच, आरोग्य विभागाकडून तपासणी आवश्यक

खामगाव शहरात दोन बनावट डॉक्टर जखामगाव : शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत विना परवाना वैद्यकीय व्यवसाय थाटणाऱ्या दोन बनावट डॉक्टरांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विरेंद्र सुरजितसिंग आणि सय्यद सिकंदर सय्यद अफसर अशी आरोपींची नावे आहेत. शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, हरियाणा येथील विरेंद्र सुरजित सिंग आणि बुलढाणा जिल्ह्यातील … Read more

मला तू खूप आवडते’ असे म्हणून गैरवर्तन करीत मुलीचा रस्त्यात अडवून विनयभंग

    खामगाव : रस्त्याने जात असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका युवकाने रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर सोमवारी घडली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका गावातील अल्पवयीन मुलगी १ जानेवारीला काम आटोपून रस्त्याने जात होती. दरम्यान, तिच्या गावातीलच विठ्ठल शांताराम व्यवहारे (वय २०) याने तिचा पाठलाग करून … Read more