group

Digital Satbara सातबारा उतारा मोबाईल नंबर टाकून कसा काढायचा?

शेतकऱ्यांना सातबारा Digital Satbara काढण्यासाठी आता तलाठी कार्यालयांमध्ये ये-जा करण्याची गरज नाही. कारण ऑनलाइन डिजिटल पद्धतीने तुम्ही तुमचा सातबारा तुमच्या मोबाईल वरच काढू शकता. आणि तो तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा वापरता येईल. यासंबंधी महसूल विभागाने एक जीआर सुद्धा जारी केलेला आहे.

त्यामुळे आता सर्व पतसंस्था असतील सर्व शासकीय कार्यालये आणि बँकांचे कार्यालय यामध्ये डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा उतारा चालणार आहे. परंतु पर्याय शेतकऱ्यांना डिजिटल सही असलेला सातबारा कसा काढायचा आणि तो वाचायचा कसा याबद्दलची सविस्तर माहिती नाही. तर चला मग या लेखांमध्ये आपण डिजिटल सातबारा Digital Satbara उतारा कसा काढायचा ते पाहू.

डिजिटल सातबारा Digital Satbara उतारा कसा काढायचा?

डिजिटल सातबारा उतारा काढण्याकरता तुम्हाला सर्वात पहिल्यांदा गुगल google वर bhulekh.mahabhumi.gov.in टाकावे लागेल.

त्यानंतर तुमच्या सोमवार पहिला पेज उघडेल ते म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाचे. या वेबसाईटचा मुख्य पानावर उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 किंवा डिजिटल स्वाक्षरी सातबारा उतारा पाहण्यासाठी इथे क्लिक करा हा पर्याय उपलब्ध दिसेल.

Read  Satbara Utara Online Maharashtra | सातबारा उतारा नकाशा महाराष्ट्र वरील चूक दुरुस्त कशी करायची?

या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला सातबारा नावाचा एक पेज तुमच्यासमोर खुला होईल.

जर तुम्ही यापूर्वीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही साइटवर सेवांचा लाभ घेऊ शकता.

परंतु जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाइटवर आले असाल तर तुम्हाला मोबाईल क्रमांक वापरून तुमचा सातबारा काढता येईल. त्याकरता तुम्हाला OTP Based Login या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला सेंटर मोबाईल नंबर च्या खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर Send OTP या पर्यायावर सुद्धा क्लिक करायचे आहे.

तुम्ही या पर्यायावर क्लिक केल्यानंतर OTP Sent on Your Mobile असा मेसेज तिथे दिसेल.

म्हणजे तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी म्हणजेच One Time Password म्हणजेच संख्या गेलेली आहे ते तुम्हाला Enter OTP च्या खालच्या रकानमध्ये टाकायचे आहे.

Read  Jamin Mojani जमीन कशीही असो तुम्ही स्वतः मोजणी करू शकता

मोबाईल वर आलेला OTP टाकल्यानंतर तुम्हाला Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

 

mansi raut age,Biography, Birthdate, Inatagram, Wikipedia, Boyfriend 2022

आता तुमच्यासमोर आपला सातबारा नावाचं एक पान ओपन होईल या पानावर Digitally Signed 7/12, Digitally Signed 8A, Digitally Signed Property Card, Recharge Account, Payment History , Payment Status असे पर्याय असतील यातल्या Digitally Signed 7/12 या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

नंतर तुमच्यासमोर डिजिटल स्वाक्षरीत सातबारा अशाप्रकारे हेडिंग असलेलं पान ओपन होईल यामध्ये सर्वात शेवटी अशी सूचना दिली असेल की, rupees 15 will be charged for download of every 7 12 his account will be deducted from available balance.

म्हणजेच याचा अर्थ असा होतो की सातबाराकरीता 15 रुपये तुमच्या अकाउंट मधून चार्ज केले जातील. त्यामुळे महाभुलेख या अकाउंट मध्ये तुमच्या खात्यात पैसे असणे गरजेचे आहे.

आता रिचार्ज कसे करायचे तर, रिचार्ज अकाउंट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. आणि त्यानंतर पंधरा रुपये डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल किंवा इंटरनेट बँकिंग असेल किंवा असेल याद्वारे जमा करता येऊ शकतात तसेच तुमच्या करता तिथे वेगवेगळे पर्याय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

Read  Last Will and Testament | आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा किती अधिकार आहे?

त्यानंतर परत तुम्हाला डिजिटल सातबारा Digital Satbara च्या फॉर्मवर जावे लागेल तिथे तुम्हाला पंधरा रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा असल्याचे दिसेल.

आता तुम्हाला डिजिटल सही चा सातबारा भेटण्याकरिता तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव आणि गावाचं नाव हे निवडायचा आहे त्यानंतर सर्वे किंवा गट नंबर टाकावा लागेल आणि सर्वात शेवटी तुम्हाला डाऊनलोड ऑप्शनला क्लिक करायचा आहे त्यानंतर डाउनलोड झालेला सातबारा तुम्हाला स्क्रीन वर ओपन होईल यानंतर यावर स्पष्ट लिहिलेलं असतं की हा सातबारा डिजिटल स्वाक्षरी तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारची सही किंवा शिक्क्याची गरज नाही.

अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण डिजिटल सातबारा Digital Satbara आपल्या मोबाईल वर घरबसल्या काढू शकता त्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही आणि सातबारा करता आपल्याला फक्त पंधरा रुपये मोजावे लागतील.

तुम्ही आमच्या मराठी शाळा या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

 

कांदा अनुदान योजना फॉर्म 2023 .

Originally posted 2022-09-20 08:39:31.

group

2 thoughts on “Digital Satbara सातबारा उतारा मोबाईल नंबर टाकून कसा काढायचा?”

Leave a Comment

x