group

E Gram Swarajya – इ ग्राम स्वराज्य ॲप

एखाद्या गावचा बजेट कसे ठरते आणि त्या गावच्या विकासाकरता निधी मिळत असतो का तर तो किती मिळतो त्यातला किती निधी ग्रामपंचायत खर्च करते या विषयी ची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेऊयात.

गावचे बजेट म्हणजे काय आणि ते कसे ठरते?

प्रत्येक वर्षाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ग्राम विकास समितीची बैठक गावांमध्ये बोलावली जात असते. त्यामध्ये गावाच्या महिला कल्याण, शिक्षण, आरोग्य अशा वेगवेगळ्या गरजांवर विचार केला जात असतो आणि त्यानंतर गरजा पूर्ण करण्यासाठी गावाकडे किती पैसा उपलब्ध आहे म्हणजेच निधी उपलब्ध आहे आणि सरकारकडून किती भेटेल? याची अपेक्षा आहे. यासंबंधीचं एक अंदाजपत्रक तयार केले जात असतं.

याविषयी चांगल्याप्रकारे ग्रामीण अर्थकारणाचे अभ्यासक दत्ता गुरव हे काय म्हणतात ते बघा गावातल्या सगळ्या योजनांचा एकत्रित अंदाजपत्रक 31 डिसेंबर पूर्वी पंचायत समितीला पाठवणे आवश्यक असतं हे अंदाजपत्रक पंचायत समिती राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवत असते. एका गावा करता केंद्र आणि राज्य सरकार तसेच इतर अशा जवळपास 1140 योजना असतात. प्रत्येक गावाला प्रत्येक योजना मिळत नाही कोणत्या गावा साठी कोणती योजना द्यायची हे गाव कोणत्या जिल्ह्यात येतो भौगोलिक परिस्थितीत या गावची कशी आहे यानुसार सर्व काही ठरत असतं.

संबंधित योजना जर राज्य सरकारची असेल तर 100 टक्के निधी राज्य सरकार देत असतं आणि केंद्राच्या बहुतांशी योजनासाठी 60 टक्के केंद्र सरकार आणि 40 टक्के राज्य सरकार देत असतं.

गुरव यांनी पुढे सांगितलं की एक एप्रिल दोन हजार वीस पासून 15 वा वित्त आयोग सुरू झाला त्यानुसार सरकार गावातल्या प्रतिमांशी प्रतिवर्षी सरकार 957 रुपये देत आहे 14 व्या वित्त आयोगाचा साठी ही रक्कम 488 रुपये होती.

Read  Laptop Anudan Yojana 2023 | लॅपटॉप अनुदान योजना 2023.

गावाकडे आता चौदाव्या वित्त आयोगाने जो पैसा दिला त्यातील 25 टक्के मानवविकास 25 टक्के केंद्र 25 टक्के कौशल्य विकास आणि राज्य सरकारच्या योजनांचा समन्वय आणि 25 टक्के पायाभूत विकासासाठी खर्च सरकारने सांगितलेलं होतं.

सध्या पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत गावाला मिळालेल्या एकूण निधीपैकी 50 टक्के निधी स्वच्छता पाणीपुरवठा इत्यादी गोष्टींवर खर्च करण्यास सांगितले आहे तर राहिलेला पन्नास टक्के निधी इतर बाबींवर खर्च करण्यास सांगितलेलं आहे.

परंतु आता प्रश्न हा निर्माण होतो की तुमच्या गावासाठी सरकारकडून किती निधी आला आणि ग्रामपंचायतीने तो कुठे खर्च केला हे तुम्हाला जर कळलं तर फार चांगलं होईल. चला तर बघू गावचा रिपोर्ट

तुमच्या गावाचे रिपोर्ट कार्ड

माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी यंदाच्या पंचायतराज दिवसाला म्हणजे 24 एप्रिल 2020 रोजी इ ग्रामस्वराज्य e Gram Swarajya या मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजेच ॲप्स लोकार्पण केलं त्यावेळी ते म्हणाले की या ॲप वर ग्रामपंचायतीच्या विकास कामांची माहिती सविस्तर रीत्या मिळेल ग्रामपंचायतीसाठी दिलेला पैसा तो कोठे खर्च झाला ही सगळी माहिती तिथे उपलब्ध असेल याद्वारे तुम्ही गावचा कोणताही नागरिक आपल्या ग्रामपंचायतीत काय सुरू आहे किंवा काय काम सुरू आहे ते कुठपर्यंत आला आहे याची सगळी माहिती मोबाईल मोबाईल वर पाहू शकेल.

तुमच्या ग्रामपंचायतीने किती खर्च केला?

तुमच्या गाव नये किती निधी खर्च केला हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअर वर ई ग्रामस्वराज्य e Gram Swarajya नावाचे ॲप म्हणजेच अप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल हे आपलिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पान ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य तुमचा जिल्हा तुमची पंचायत समिती आणि तुमचे गाव अशाप्रकारे निवडायचे आहे. हे सर्व निवडल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल या पेजवर सर्वात वर ची माहिती भरलेली असते ती तुम्हाला दिसेल ज्यामध्ये तुम्ही राज्य जिल्हा तालुका आणि गावाचं नाव पाहू शकाल गावाच्या नावासमोर तुम्हाला कोड क्रमांकही दिसेल.

Read  Mahila Swayam Siddha Yojana 2023 | महिला स्वयं सिद्ध योजना २०२३ .

आता तुम्हाला गावची आर्थिक स्थितीच्या वर्षाची बघायचे असेल ते वर्ष निवडावा लागेल त्यानंतर तुमच्यासमोर तीन वेगवेगळे पर्याय उघडतील या त्यातील पहिला पर्याय ER Details म्हणजेच याला Elected representative गावातील निवडलेल्या सदस्यांची नावे येथे तुम्हाला दिसतील  असा हा पर्याय असतो.

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर मला तुमच्या गावातील सदस्यांची सर्व माहिती दिसेल म्हणजेच त्या सदस्याचे नाव पद व जन्मतारीख याची माहिती दिलेली असते इथे एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे e Gram Swarajya हे अप्लिकेशन नुकताच लॉंच करण्यात आलेला आहे त्यामुळे यामध्ये सर्व माहिती भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे त्यामुळे सर्वच गावातील सर्वच निवडून आलेल्या सदस्यांची किंवा प्रतिनिधींची नाव तिथे दिसतीलच असं नाही पण असं असलं तरी गावच्या विकासासाठी सरकारने किती पैसा दिला आहे आणि त्यातला किती पैसा ग्रामपंचायतीने खर्च केला आहे तुम्हाला नक्कीच कळेल.

त्यानंतर दुसरा पर्याय येथे उपलब्ध आहे तो म्हणजे ज्या आर्थिक वर्ष तुम्ही निवडलेला असतं ते सुरुवातीला तिथे दिलेला असतो त्या नंतर गावचा कोड आणि नाव सुद्धा दिलेलं असतं त्यानंतर तुम्हाला त्या आर्थिक वर्षासाठी तुमच्या गावासाठी किती निधी विमा रक्कम मिळालेली आहे हे तुम्हाला reciept पॉलिसी फक्त या पर्यायावर दिसेल यापैकी किती निधी खर्च झाला ही रक्कम तुम्हाला expenditure या पर्याय समोर दिलेली असते.

Read  Pith Girni Yojana Maharashtra 2022 | पीठ गिरणी योजना महाराष्ट्र २०२२ .

त्याखाली तुम्हाला list of schemes हा पर्याय दिलेला असतो म्हणजे ग्रामपंचायतीला जो एकूण मिळाला त्याची विभागणी केलेली असते त्यामुळे तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला आणि त्यापैकी किती किती निधी खर्च झाला याची सर्व माहिती तिथे मिळेल.

जर निधी उरला असेल तर त्याचे काय होते?

या ॲप वर तुम्हाला अशी बरीच गावे दिसतील तिच्या ग्रामपंचायतीच्या निधीपैकी 20 30 40 50 लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च करता आली नाही. मग हा खर्च न केलेला निधीचे काय होते. याबाबत डॉ. कैलास बवले यांनी चांगल्या रीतीने सांगितले आहे ते म्हणतात की, ग्रामपंचायतीने खर्च न केलेला निधी सरकारला परत जातो आणि जर निधी परत जात असेल तर ती ग्रामपंचायत अकार्यक्षम असते असे समजले जाते. पैसे खर्च करण्यासाठी सरपंचाकडे डोकं असणे गरजेचे आहे. पैसे नेमके कोठे खर्च करायचे? हे त्याला कळायला हवं पैसे परत गेले तर, त्याचा अर्थ त्यांना गावच्या विकासासाठी  आलेला निधी वापरता आलेला नाहीये आणि त्यामुळे गावचा प्रॉपर विकास आराखडा तो सरपंच तयार करू शकला नाही असा त्याचा अर्थ होतो.

अशाप्रकारे मित्रांनो ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी गावाचा आराखडा तयार करून सरकारकडून आलेला निधी योग्य रीतीने गावावर खर्च करणे आवश्यक आहे जर असे केले नाही तर ग्रामपंचायत कडे आलेला सरकारकडून निधी परत जाईल आणि त्यामुळे गावचा विकास खुंटेल व गावचे नुकसान सुद्धा होईल.e Gram Swarajya इ ग्राम स्वराज्य ॲप च्या माध्यमातून आपणास सर्व कही बघता येईल.

 

 

 

Originally posted 2022-09-21 08:55:13.

group

5 thoughts on “E Gram Swarajya – इ ग्राम स्वराज्य ॲप”

  1. गावातील भागात सर्वात जास्त भोंदू कारभार सुरू आहे.सर्वात मोठा भ्रष्टाचार होतोय सामान्य माणसाला मायपावर वर दादागीरी केली जाते, अडचणीत आणले जाते सर्व निधी हडप केला जातो.

    Reply

Leave a Comment

x