Falpik Vima Yojana 2022 | फळपीक योजनेचा विमा शेतकऱ्यांना कसा मिळतो

Falpik Vima Yojana फळपीक योजनेचा विमा शेतकऱ्यांना कसा मिळतो…! जाणून घ्या काय आहे माहिती

विमा :

हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही. फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना राबवली जात आहे.

मित्रांनो, खरीप फळपीक विमा 2021 च्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 18 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात आला. ज्या शासना निर्णयाच्या माध्यमातून मृग बहार सन 2021 साठी फळपिक विमा योजनेसाठी विमा कंपन्यांना 17,77,39,682 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

मित्रांनो, आपण जर पाहिले तर 2021 मध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊन देखील पीक विमा वाटप करण्यात आले आहे. त्यासाठी कारण सांगितलं जात होतं ते म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणारे अनुदानचा लाभ घेण्यासाठी 2021 करता 30 कोटी रुपयांचा निधी पहिला म्हणून वितरित करण्यात आला व त्यांनी याच माध्यमातून जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये जालना असेल त्याप्रमाणे परभणी औरंगाबादच्या काही भागांमध्ये मोसंबीच्या पिक विम्यासाठी किंवा डाळिंबाच्या फळपिकासाठी काही निधी वितरित करण्यात आलेला होता. या भागांमध्ये शेतकऱ्यांना निधी, अनुदान आल्यानंतर आपल्या कामाचं वाटप केले जाईल.

Read  PM Kisan Yojana New Rules 2024 | पी एम किसान योजना नवीन नियम २०२४ .

या महिन्यात 15 फेब्रुवारी 2021 पासून विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा 2021 खरीप हंगामात वाटप सुरू करण्यात आले व असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आपण शासन निर्णय आपण पाहू शकता. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना 2021 करता शिफारस विचारात घेता, राज्य विमा हप्ता अनुदान 17.77 कोटी एवढा निधी भारतीय कृषी विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता :

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतंर्गत राज्यात सन 2020-21 साठीचे पीक निहाय कर्ज दर हे विमा संरक्षित रक्कम म्हणून ग्राह्य धरण्याचे निश्चित करण्यात आले असून सदर दर सन 2021-22 ते 2023-24 या कालावधीसाठी पीक विमा संरक्षित रक्कम म्हणून कायम राहतील.

Read  Farm Land count from mobile app 2023 | शेतमोजनी करा मोबाईल अँप वरून २०२३.

विमा क्षेत्र घटक :

अधिसुचित फळपिकांखाली एकूण 20 हेक्टर व त्यापेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळात योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार महसूल मंडळे ठरविण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरुन तसा अहवाल गेल्यानंतर कोणत्या मंडळाचा या योजनेसाठी सहभाग करुन घ्यावयाचा हे ठरवले जाते.

शासन निर्णय :

प्रधानमंत्री फसल विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2021 ते 2024 या तीन वर्षासाठी मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) या 8 फळपिकांसाठी व आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या 9 फळपिकांसाठी लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. फळबाग लागवड केलेल्या जिल्ह्यात निर्धारीत केलेल्या हवामानुसार हा विमा लागू केला जातो. जिल्ह्यामधील जी मंडळी या पिक विमा साठी पात्र असतील त्या शेतकऱ्यांना पीक विमा यादी मिळण्यासाठी मदत होणार आहे. अशा प्रकारे फळपिक विमा योजनेच्या संदर्भात असलेल्या बद्दलची माहिती तुमच्या उपयोगी पडेल अशी आशा करतो. या विषयीची सविस्तर माहिती तुम्ही mharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता.

Read  Talathi Mandal Adhikari Bharti 2023 | तलाठी व मंडळ अधिकारी भरती

Falpik Vima Yojana ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे नक्की वाचा:- बायोग्राफीबातमी मराठी

Leave a Comment