शेतात फवारणीची योग्य पद्धती Fawarani in Marathi

फवारणी करण्याची योग्य पद्धती Fawarani in Marathiफवारणी करण्याची योग्य पद्धती किंवा फवारणी करण्याचा योग्य कालावधी कोणता? Fawarani in Marathi फवारणी करत असताना प्रथम आपण नैसर्गिक नियमांचा विचार करायला हवा. बाजूच्या शेतामध्ये फवारणी केली म्हणून आपणही फवारणी करून घ्यायची. ही चुकीची पद्धत आहे आणि तुम्हाला माहीत आहे की, ही शेती केवळ तुमच्यासाठी मर्यादित नाही तर ती तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा उपयोगी साधन आहे.

फवारणी करण्याची योग्य पद्धती Fawarani in Marathi

शेतामध्ये फवारणी Fawarani in Marathi करत असताना अनेक गोष्टींचा विचार करूनच फवारणी करावी. तसे पाहिले तर फवारणी हा शेवटच्या टप्प्यातल्या प्रश्न आहे. जर एखादा प्रश्न आपल्याला साध्या सरळ मार्गाने सोडवता येत असेल तर आपण तो प्रश्न साध्या सरळ सोप्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करायला पाहिजे. काही लोक फुले येण्या अगोदरच फवारणी करतात.

Read  Bhendwal Ghat Mandani Bhavishyawani 2021 भेंडवळ घट मांडणी

फवारणी करण्याची वेगवेगळी कारणे असतात. परंतु ही कारणे आपण जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजेच कापसाच्या झाडावर ती जे काही कीड पहिल्यांदा पडतात, त्याचे निवारण आपल्याला नैसर्गिक पद्धतीनेच करायला पाहिजे. तर सुरुवातीलाच विषारी रसायनांची फवारणी करून सर्व कीटक मारायचे त्यामध्ये मित्र किडे आणि शत्रू किडे सुद्धा मरण पावतात, हे चुकीची पद्धत आहे. तुम्ही एकाच वर्षाचा विचार करून चालणार नाही तर अनेक पिढ्यांचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागणार आहे.

कोणती काळजी घ्यावी ?

ज्यावेळेस पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव झाला असेल तरच फवारणी करण्यासाठी योग्य कालावधी झाला असे म्हणता येईल. परंतु आपण उगाचच रासायनिक फवारणी करण्यात वेळ वाया गमावतो. फवारणी करण्याचे योग्य वेळ आली का हे पाहणे गरजेचे आहे. तर फवारणी करणे अगोदर आपल्या शेतातील पाच सहा झाडे निवडून घ्यायची. त्या झाडाचे निरीक्षण कसे करायचे तर झाडाचे वरचे पान, मधले पान आणि सर्वात खालचे पान घेऊन त्याच्या मागच्या बाजूला त्यावर रस शोषून घेणारे किडे आहे का ते पहा. Fawarani in Marathi

Read  How To Check Land Map In Maharashtra Online 2023 | जमिनीचा नकाशा पहा आत्ता मोबाईल वर २०२३.

आपल्याला आठ ते दहा किडे दिसले किंवा मावा अळीचा प्रादुर्भाव दिसला तरच फवारणी करणे उपयोगाचे ठरेल. परंतु पहिल्यांदाच आपण रासायनिक फवारणी न करता नैसर्गिक पद्धतीने म्हणजेच पिवळे चिकट सापडे किंवा निळे चिकट सापडे असतील तर त्याचा उपयोग आपण करायला पाहिजे. तसेच तुडतुडे जर आपल्याला त्या पानावर तीन ते चार पाहायला मिळाले असेल तरच फवारणी करायला पाहिजे.

कारण की हे तुडतुडे पानातील रस शोषून घेतात आणि पिकांना मोठे नुकसान पोहोचवतात. तसेच पांढऱ्या माशीचे संकट सुद्धा कापसाच्या झाडावरती येते. तर पानाच्या मागच्या बाजूला आठ दहा कीड किंवा दहा ते पंधरा पिल्लू पांढऱ्या माशीचे आढळले असेल तर फवारणी करण्याचे योग्य वेळ आहे. कारण की ते आपल्या पिकांना हानी पोहोचवतात

Read  7/12 Mahabhulekh 2023 | 7/12 महाभुलेख 2023.

पिकांवरील वेगवेगळी कीड Fawarani in Marathi

Fawarani in Marathi याच्या व्यतिरिक्त ही कीड मिक्स पद्धतीने सुद्धा पराटीवर पडत असते. म्हणजेच मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, रस शोषक किडे हे सर्व एकत्र येऊ शकतात. तर त्यासाठी निरीक्षण करण्यासाठी झाडाचे वरचे पान, मधले पाण, खालचे पान घ्यायचे आणि त्याचे निरीक्षण करायचे. त्यावर तुम्हाला दहा ते पंधरा किडे आढळून आले तर फवारणी नक्की करा.

कारण की हे एकत्रित मिश्रण जरी असला तरीसुद्धा हे पिकासाठी हानीकारक आहेत. परंतु जोपर्यंत रस शोषक किडी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही, तोपर्यंत तुम्ही नैसर्गिक पद्धतीनेच कीड नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा आणि शेतीला वाचवा, अनेक पिढ्यांना देखील वाचवा, आपल्या काळ्या आईला वाचवा आणि निसर्गाचा समतोल राखून ठेवा.

Leave a Comment