Gajar Gavat असे करा शेतातील गाजर गवत नष्ट!

शेतकऱ्यांसाठी Gajar Gavat गाजर गवतावर नियंत्रण करण्यासाठी काही खास उपाय. आपल्याला माहिती आहे की, गाजर गवत यालाच (काँग्रेज गवत) या नावाने देखील ओळखले जाते. या गवताचा प्रसार पुण्यामध्ये प्रथम 1955 साली आढळून आला आणि आता संपूर्ण भारतातच नाही तर हा सर्व जगभर आहे.

Gajar Gavat असे करा शेतातील गाजर गवत नष्ट!

याचा उगम जर आपण पहिला तर उत्तर अमेरिकेतील मेक्सिको इथून या गवताचा उगम झालेला आहे. गाजर गवत हे जमिनीतील पोषक द्रव्ये, खत-पाणी, नत्र ओढून घेत असते. त्यामुळे जमीन नापीक होण्यासारखी भीती असते किंवा इतर पिकांना ते पोषण मिळू शकत नाही म्हणून इतर पिकाची उत्पादन क्षमता घटते.

Read  farmers app हे अप्लिकेशन सर्व शेतकऱ्यांनच्या मोबाईलमध्ये असावे !

गाजर गवत हे शेतातून काढून घेतल्यानंतरही पुन्हा तिथेच उगवते असं हे गवत आहे. त्यामुळे बरेच शेतकरी त्रासले आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे गवत नियंत्रनात आणण्यासाठी काय उपाय करावे लागतील ते आपण पाहणार आहोत.

गाजर गवत नियंत्रणात आणण्याचे तीन उपाय आपण पाहूया.

शेतकऱ्यांना मेक्सिको नावाच्या भुंग्याद्वारे गाजर गवतावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. 1985 ते 1986साली महाराष्ट्रातील सर्वप्रथम मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये या किड्यांची प्रजनन व्यवस्था केलेली आहे. गाजर गवतावर किड्याच्या मार्फत संशोधन करण्यात आले आहे आणि तो किडा म्हणजे मेक्सिको नावाचा भुंगा आहे.

पहिला उपाय Gajar Gavat

शेतकऱ्यांनाही महागात पडणारी ही पद्धती आहे. परंतु गाजर गवताचा नाश करणारीच आहे. मेक्सिकन भुंगा हा एक रुपयाचा एक, अशाप्रकारे शेतकऱ्यांना मिळू शकतो. तर एका हेक्‍टरमध्ये पाचशे भुंग्यांची खरेदी करून शेतकऱ्यांनी व्यवस्थित जर व्यवस्था केली असेल तर, हे भुंगे गाजर गवताला नियंत्रणात आणण्यास उपाय कारक आहेत.

Read  पी एम किसान योजना २०२३ | PM Kisan Beneficiary Status 2023 List Check @pmkisan.gov.in

दुसरा उपाय Gajar Gavat

ज्या शेतकऱ्यांना ही परवडणारी आहे, त्यांनी मेक्सिकन भुंगे यांचा वापर करून देखील गाजरगवत नियंत्रणात आणले तरी चालेल.
बऱ्याच शेतकऱ्यांना हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी आणखीन एक सोपा उपाय आहे. जाडे मीठ, आधीच्या काळात घरगुती वापरात होते. हे जाड मीठ दहा किलो आणि त्यामध्ये पन्नास लिटर पाणी टाकून, त्याचे द्रावण करून जर आपण गाजर गवतावर त्याची फवारणी केली तर गाजरगवत नियंत्रणात येऊ शकते. गाजर गवत नाहीस होऊ शकते.

तिसरा उपाय Gajar Gavat

शेतकऱ्यांसाठी आणखीन एक तिसरा उपाय म्हणजे घरच्या घरी करता येणारा उपाय आहे. शेतामध्ये किंवा शेताच्या कडेला तरोटा नावाचं गवत असते. तरोट्याच्या झाडाला ऑक्टोबरमध्ये शेंगा लागतात आणि या तरोट्याच्या शेंगातील बी आपल्याला काढायचे आहेत आणि शेतात पेरणीच्या अगोदर आपण या बियांची धुळफेक त्या जागेवर केली की, जिथे गाजर गवत उगवते तिथे तरोटा निघेल, तुम्हाला फरक जाणून येईल.

Read  Bandist Shelipalan Mahiti in Marathi Maharashtra शेळीपालन 2021

या माध्यमातून गाजर गवतावर नियंत्रण मिळवता येऊ शकतो. आपण या मध्ये महत्वाचे तीन उपाय पाहिलेले आहेत. पहिला म्हणजे मेक्सिको भुंगा बोलावून तुम्ही नियंत्रणात आणू शकता. दुसरा म्हणजे जाडे मीठ आणि पाण्याचे द्रावण करून गाजर गवतावर फवारणी करून आणि तिसरा उपाय म्हणजे तरोट्याच्या बियांची धूळफेक करून सुद्धा तुम्ही Gajar Gavat नियंत्रणात आणू शकता.

Leave a Comment