Gram Panchayat Visarjan information in Marathi language | ग्रामपंचायत विसर्जन केव्हा होते?

Gram Panchayat Visarjan information in Marathi language ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळताना ग्रामपंचायतीने किंवा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी असक्षमता दाखवली तर ग्रामपंचायत अधिनियम कायदा सरपंच अविश्वास ठराव ग्रामपंचायत सदस्य अपात्रता यांसारख्या कलमांची तरतूद आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीची कार्यभार सांभाळण्यासाठी सक्षम नसेल तर शासनाकडून ग्रामपंचायतीचे विसर्जन Gram Panchayat Immersion करण्यात येते.

ग्रामपंचायत विसर्जन :
Gram Panchayat Visarjan

1) एखादी ग्रामपंचायत जेव्हा अधिनियम कायदे यांनी वेळोवेळी निर्देशित केलेले कार्य कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम नसेल तर तिला राज्यशासनाकडून ग्रामपंचायत म्हणून कार्यरत राहण्यास अपात्र ठरविण्यात येते म्हणजे ग्रामपंचायतीचे विसर्जन होते.

2) ग्रामपंचायतीची विसर्जन करण्याचा अधिकार राज्य शासनाचा असतो.

Read  PM Kisan Yojna e KYC | पी एम किसान निधी योजना ई - के वाय सी

3) महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमाच्या कलम 145 अन्वये ग्रामपंचायतीच्या निर्धारित असलेला पाच वर्षाचा काळ पूर्ण होण्याअगोदरच खालील कारणांसाठी ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्याचा अधिकार राज्य शासनाला कायद्याने दिलेला आहे.

4) एखादी ग्रामपंचायत आपल्या अधिकार मर्यादांचे उल्लंघन करीत असेल किंवा अधिकारांचा दुरुपयोग करत असेल.

5) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अन्वये किंवा इतर कोणत्याही कायद्यान्वये तिला घालून दिलेल्या कर्तव्य पार पाडण्याची सक्षम नसेल किंवा आपली कर्तव्य पार पाडण्यात ती कसूर करत असेल तर तिचं विसर्जन करण्याचा अधिकार आहे.

6) जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाची ती दूर आग्रहाने अवज्ञा करीत असेल तर.

7) या अधिनियमाखालील लेखा यांची लेखापरीक्षा किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या आणि कामाच्या निरीक्षणासंबंधी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा कोणताही सक्षम प्राधिकारी किंवा राज्य शासन यांनी दिलेल्या आदेशाकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत असेल तर.

Read  Download Online Ration Card आता राशन कार्ड ठेवा मोबाईलमध्ये

वरीलपैकी कोणत्याही कारणासाठी एखादी ग्रामपंचायत दोषी असेल तर राज्य शासनाचे मत तयार झाले असल्यास परिषदेमध्ये विचारविनिमय करून अशा ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकते. मात्र कोणत्याही ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्यापूर्वी राज्य शासन तिला आपले स्पष्टीकरण देण्याची किंवा बाजू मांडण्याची संधी अवश्य देत असते.

ग्रामपंचायत विसर्जनाचे परिणाम :

ग्रामपंचायत विसर्जनाचे आपल्याला गावात तसेच गावातील लोकांवर झालेला परिणाम दिसून येतो. ग्रामपंचायत विसर्जनाच्या आदेशात नमूद केलेल्या तारखेपासून त्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना आपली पदे सोडावे लागतात. विसर्जनाच्या कालावधीत राज्य शासनाकडून वेळोवेळी ज्या व्यक्तींची नियुक्ती केली जाते. अशा व्यक्तींचा त्या ग्रामपंचायतीच्या सर्व अधिकारांचा वापर करतात व तिचे कर्तव्य पार पाडतात. विसर्जनाच्या कालावधीत या ग्रामपंचायतीची सर्व मालमत्ता राज्य शासनाच्या अधीन होते.

Read  Bank Of Maharashtra Mega Job 2022 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मेघा भरती

विसर्जित ग्रामपंचायतीची निवडणूक :

विसर्जित झालेल्या ग्रामपंचायतीला सर्व अधिकार राज्य शासनाचे लागू होतात. अधिनियमातील वरील तरतुदींच्या अंतर्गत एखाद्या ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्यात आले असेल, तर तिच्या विसर्जनाची तारखेपासून सहा महिन्याचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्या पंचायतीची नव्याने निवडणूक घेणे बंधनकारक असते. तथापि अशा निवडणुकीनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा विसर्जित ग्रामपंचायतीच्या उर्वरित कार्यकाळ असतो म्हणजेच विसर्जित ग्रामपंचायतीचे विसर्जन झाले नसेल तर ती पुढे तितक्या कालावधी पुढे इतक्या कालावधी पुरती अस्तित्वात राहिली असती. तितक्याच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ असतो.

Gram Panchayat Visarjan information in Marathi language.
ग्रामपंचायत विसर्जन ही माहिती तुम्हाला कशी वाटले ते कमेंट करून नक्की सांगा.

 

 

 

Leave a Comment