Indian Tea Recipe तुम्ही बनवलेला चहा सर्वांना आवडेल

चहा करताना हा फॉर्म्युला वापरा आणि वाह वाह मिळवा.

Indian Tea Recipe चहा सर्वांनाच आवडतो. भारतीयांच आवडतं पेय म्हणजे चहा, बरेच लोकं आपल्या दिवसाची सुंदर सुरुवात चहानेच करतात आणि लोकांचा असा विश्वास आहे की, जर त्यांना सकाळचा चहा चांगला मिळाला, तर त्यांचा संपूर्ण दिवस चांगला जातो. तर काही लोकांना काम करताना देखील अधून-मधून चहा पिण्याची सवय असते. असे मानले जाते की, चहा आरोग्यासाठी चांगला असतो आणि त्यामुळे वजनही कमी होते. आता कोरोनामुळे सर्वत्र लोकं घरुन काम करत असल्यामुळे घरीच त्यांना चहा बनवून प्यावा लागतो. केवळ चार गोष्टींनी बनवलेला हा चहा अनेक प्रकारे बनवला जातो.

प्रत्येक राज्यामध्ये चहासाठी स्वतःची एक वेगळी रेसिपी आहे. कोणी चहामध्ये किंचीत मीठ टाकतं, तर कोणी साखर, तर कोणी गुळ टाकतात. काही लोकं दुध टाकून चहा बनवतात, तर काही लोकं दूध न टाकता चहा बनवतात. राज्यातच काय, जर तुम्ही कोणत्याही नातेवाईकांकडे किंवा मित्राकडे गेलात, तर त्यांच्या घरची चहाची चव ही वेगळी असते. चहामधील वापरल्या जाणाऱ्या गोष्टी तर त्याच असतात, पण तरीही चहाची चव वेगळी कशी? त्याचा फॉर्म्यूला काय? तुम्ही याचा कधी विचार केला आहे का?

Read  Car Charging Station information in Marathi | कार चार्जिंग स्टेशन महिती

आम्ही तुम्हाला चहाचा एक फॉर्म्यूला सांगणार आहोत ज्याच्यामुळे तुमच्या चहाला एक विशिष्ट चव येईल.

विविध प्रकारचा चहा बनवला जातो :
बर्‍याच प्रकारचे चहा बनवले जातात आणि प्रत्येक चहामध्ये तो बनवण्याचा एक खास मार्ग असतो. ग्रीन टी, ब्लॅक टी, ओलॉन्ग टी, माचा चहा, हर्बल टी, व्हाइट टी, ब्लेंड्स टी अशा वेगवेळा चहा असतात. प्रत्येक चहा उकळण्याची पद्धत वेगळी आहे. तसे, सर्वसाधारणपणे दूध किंवा दुधाशिवाय चहा बनवला जातो. आरोग्यासाठी चांगला आणि जुन्या काळा प्रमाणे, चहा हा बिना दुधाचा बनवला जातो. परंतु सहसा, दुधासह पिवळ्या रंगाचा चहा सर्वात जास्त प्यायला जातो.

लोकं काय चुका करतात?

चहा बनवताना बर्‍याचदा लोकं चुका करतात, ज्यामुळे चहाची चव बदलते. बरेच लोकं आधी दूध घेतात त्याला गरम करतात आणि मग त्यात पाणी, दुसरे पदार्थ टाकून त्याला उकळतात. जे चुकीचे आहे. गरम दुधात पाणी घालून पुन्हा एकदा आपल्याला बर्‍याच काळासाठी दूध उकळावे लागेल आणि ते दुधाला वाया घालवते आणि जास्त गॅस दोखील वाया जातो. बरेच लोकं चहा पावडर सगळ्यात शेवटी घालतात. ही देखील एक चुकीची पद्धत आहे. चहा पावडरला चांगलं उकळं गेलं पाहिजे, यामुळे तुम्हाला कमी चहा पावडर टाकून देखील चांगली चव आणि सुगंध दोन्ही मिळतो.

Read  PM kisan Status 10th Installments Beneficiary List

चहा बनवण्याचा योग्य मार्ग कोणता?

चहा बनवणे जरी आपल्या चवीवर अवलंबून असले तरी, ब्रिटीश स्टँडर्ड इन्स्टिट्यूशनने चहा बनवण्याची आदर्श पध्दत सांगितली आहे. ज्याला चहा बनवण्याचा योग्य मार्ग मानला जातो. विशेष गोष्ट म्हणजे बरीच वर्षे जुन्या शहरात चहा विक्री करणारे मोठे व्यापारीही या मार्गाने चहा बनवत आहेत. तर काही पद्धती अशा आहेत, ज्यामध्ये आपल्याला चहा बनवण्यासाठी दोन भांडी लागतात.

तुम्ही एका पात्रात फक्त दूध उकळायला ठेवा आणि त्या पात्राला मधे मधे चमचाने ढवळा. त्यानंतर दुसरे भांड घ्या आणि त्यामध्ये चहा बनवण्यासाठी पाणी ठेवा. नंतर पाणी गरम झाल्यावर त्यात चहाची पाने किंवा चहा पावडर घाला, ही पावडर साखरेच्या प्रमाणापेक्षा कमी असावी. चहाला उकळी येऊ द्या आणि मग त्यात तुम्हाला हवी तशी आणि चवी प्रमाणे साखर घाला.

Read  Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2022 | अतिवृष्टी अनुदान भरपाही यादी २०२२ .

यानंतर, तुम्हाला आलं, लवंगा, मिरपूड घालायची असल्यास तुम्ही ती घालू शकता. परंतु सामान्य चहामध्ये हे टाकण्याची आवशकता नाही. त्याचबरोबर दुध चांगले उकळा आणि चहाचे पाणी एका बाजूला उकळू द्या. चांगले उकळल्यानंतर, चहामध्ये दूध घाला आणि त्याला जास्त गरम करू नका आणि उकळल्यानंतर फिल्टर करावे. पाण्याच्या प्रमाणानुसार त्यात दूध घालावे. अशाप्रकारे चाहा केल्यास चहा पिणाऱ्या कडून तुम्हाला वाह वाह ऐकण्यास मिळेल.

Leave a Comment