जैविक खत | jaivik sheti

jaivik sheti  प्रयोगशाळेत नत्र स्थिर करून जमिनीतील स्फुरद विरघळविणाऱ्या व सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या जिवाणूंची स्वतंत्ररीत्या वाढ करून योग्य अशा वाहकाने मिसळून तयार होणाऱ्या खताला जिवाणूखत असे म्हणतात. तसेच या खाताना बॅक्टरियल कल्चर , जिवाणूसंवर्धन असेही म्हणतात.

जैविक खत | jaivik sheti

शेतकरी अधिक उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने अधिक उत्पादन देणारी पिके एका शेतात घेतात त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता कमी होऊन आपल्याकडे जमिनीत नत्राचे प्रमाण कमी आहे सेंद्रीय खताद्वारे नत्राचा पुरवठा करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी फक्त जन्म दिला रासायनिक खताचा पुरवठा करणे जमिनीच्या प्राकृतिक दृष्टीने योग्य नाही त्यामुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म बिघडत आहेत.

म्हणून आजच्या परिस्थितीत जैविक खताचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे त्यातच रासायनिक खताच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आहे पर्यायाने पिकाची उत्पादन अपेक्षित प्रमाणात मिळत नाही अशा परिस्थितीत जिवाणू खताचा उपयोग करणे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असून त्याचा अधिक उपयोग करणे ही काळाची गरज बनली आहे.

जिवाणू खत वापरणे शेतकऱ्यांना होणारे फायदे – jaivik sheti

* सेंद्रिय पदार्थाचे जलद विघटन होते.
* बियाण्याची उगवण क्षमतेत वृद्धी होते.
* पिकाची जोमदार वाढ होते तसेच त्यांच्यावर रोगप्रतिकारक शेतीतही वाढते.
* अतिरिक्त जिवाणू खतामुळे हवेतील नत्र शोषले जाऊन ते पिकांना उपलब्ध करून दिले जाते.
* अविद्राव्य स्वरूपातील पुरत विरघळून पिकांना उपलब्ध करून दिला जातो.
* जीवन वगैरे नैसर्गिक आहेत त्यामुळे त्यांचा जास्त मात्रेने देखील जमिनीवर किंवा पिकावर दुष्परिणाम होत नाही.
* जमिनीची पोत सुधारून धान्य फुले व फळे यांचे भरघोस व दर्जेदार उत्पादन मिळते.
* शेतकरी करत असलेल्या रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते.

पिकामधये नत्र तयार करनारे जिवाणू खतांचे प्रकार पुढीलप्रमाणे –

* अझोटोबॅक्टर –                                                                                                                                                                    हे जीवाणू जमिनीमध्ये पिकाच्या मुळाभोवती राहून सहजीवी पद्धतीने कार्य करीत असतात हे जवानी मुख्यता उदासीन किंवा किंचित विम्ल जमिनीत आढळून येतात ते हवेतील मुक्त नत्र शोषून घेतात व पिकांना उपलब्ध करून देतात हे जिवाणू खत शेंगवर्गीय पिके वगळून इतर सर्व एकदल व तृणधान्ये पिकांना उपयोगी पडतात. कापूस, ऊस, ज्वारी ,बाजरी ,मका ,मिरची ,बटाटा, कोबी, टोमॅटो, सूर्यफूल ,भाजीपाला इत्यादी पिकांसाठी त्याचबरोबर सर्व पदांसाठी फुलझाडांसाठी ही वापरता येतात.

Read  Loan Waiver Yojana Maharashtra 2023 | कर्जमाफी योजना महाराष्ट्र २०२३.

* रायझोबियम –                                                                                                                                                                      जिवाणू चे कार्य सहजीवन पद्धतीने चालते हे जिवाणू पिकाच्या मुळावरील ती निर्माण करत असतात या ग्रंथाद्वारे हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन मुळावाटे पिकास उपलब्ध करून दिला जातो रायझोबियम जिवाणू हे खत फक्त शेंगवर्गीय द्विदल पिकासाठी वापरावे एकच राजे भीम जिवाणूखत सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही त्यामध्ये वेगवेगळे गट आहेत वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारचे जिवाणू खत द्यावे.

* अझोस्पिरिलम –                                                                                                                                                                  हे जिवाणू खत पिकाच्या मुळात किंवा पिकनिक मुलाच्या सभोवतालच्या मातीत राहून नत्र स्थिर करते हे जिवाणू असिटोबॅक्‍टर जीवाणू पेक्षा पिकांना जास्त नत्र पुरवठा करतात.

* असिटोबॅक्‍टर –                                                                                                                                                                      हे एक नत्र स्थिर करणारे जिवाणू आहे ऊस पिकामध्ये मुळाद्वारे प्रवेश करून उसामध्ये नत्र स्थिरीकरणाचे कार्य योग्य प्रकारे करते प्रक्रिया मधे 50 टक्के नत्र स्थिरीकरण होऊन  पिका मध्ये चांगली वाढ होते त्याचे उत्पादनही 15 ते 20 टक्क्यांनी वाढते.

पिकामध्ये स्फुरद विरघळणारे जिवाणू खते –

अस्पजीलस अवमोरी , पेनिसिलियम डिझीटेटम, बॅसिल्लस पॉलीमीकझा, हे जिवाणू पीएसबी या संक्षिप्त नावाने ओळखले जातात जमिनीत स्थिर झालेला स्फुरद पिकांना उपलब्ध करून देतात तसेच वापरलेला सुरत कार्यक्षमरीत्या उपयोगात आणतात हे जिवाणू खत सर्व प्रकारच्या पिकांना वापरता येते.

Read  पीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022

सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जिवाणू खते –

ट्रायकोडर्मा, अस्परजीलस जिवाणू असे अनेक प्रकारचे जिवाणू सेंद्रिय पदार्थांचे विघटन घडवून आणत असतात कंपोस्ट जिवाणूखत एक टन सें द्रिय पदार्थ कुजविण्यासाठी एक किलो या प्रमाणात वापरावे कंपोस्ट खत तयार करणे ही एक जीवशास्त्रीय प्रक्रिया आहे. त्यामध्ये सेंद्रीय पदार्थाचे सूक्ष्मजीव वापर विघटन होते आणि कार्बन व ते नायट्रोजन यांचे गुणोत्तर कमी होते अशा विघटन झाल्यावर पदार्थ यांनाच कंपोस्ट खत असे दोन म्हणतात.

कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धती – jaivik sheti

* ढीग पद्धत –                                                                                                                                                                          अधिक पद्धत ही एक अशी पद्धत आहे त्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचे विघटन जि तेवाणू हवेच्या सान्निध्यात घडवून आणत असतात. असाडी तयार करत असताना दिव्याची लांबी चार मीटर रुंदी दोन मीटर असावी लागते तयार करताना तो वरच्या बाजूस निमुळता केला जावा त्याच्यावरच्या पृष्ठभागाची रुंदी ही पायांपेक्षा 60 सेंटिमीटर ने कमी असायला पाहिजे ही पद्धत जास्त पावसाच्या प्रदेशात वापरतात.

* खड्डा कंपोस्ट पद्धत –                                                                                                                                                            या पद्धतीमध्ये जिवाणू सेंद्रिय पदार्थांचे विघटन हे हवा वीरहीत वातावरणात घडून आणत असतात. खड्डा निवडताना तो उंच जागी असावा खड्ड्यात बांध घालायला पाहिजे, त्यामुळे पावसाचे पाणी शेतात जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल कंपोस्ट तयार करण्यासाठी खड्ड्याची रुंदी दोन मीटर तसेच खोली एक मीटर आणि लांबी चार मीटर पासून ते दहा मीटरपर्यंत ही ठेवली तरी चालते सेंद्रिय पदार्थ उपलब्धतेनुसार ठेवली तरी चालेल. पद्धत मुख्यत्वेकरुन कमी पावसाच्या प्रदेशा मध्ये वापरतात.

कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खड्डे भरण्याची पद्धत शेतकरी कशी वापरू शकतात त्याबद्दलची माहिती –

शेतकर्‍याने आपल्याकडे असणारा कचऱ्याचे शक्य तेवढे बारीक तुकडे करावेत, एका मोठ्या टाकीमध्ये पाणी घेऊन प्रति टन सेंद्रिय पदार्थ साठी 100 किलो जनावरांचे शेण मिसळून घ्यावे यासाठी ते करताना शेण व पाणी यांचे 185 प्रमाण वापरावे तसेच सेंद्रिय पदार्थाचे जलद विघटन करणारे जिवाणू.

Read  Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना.

एक किलो प्रति टन सेंद्रिय पदार्थाचमधे मिसळून घ्यावी.  तसेच दुसऱ्या टाकीमध्ये दोनशे लिटर पाणी घेऊन प्रति टन सेंद्रिय पदासाठी आठ किलो युरिया आणि सुपरफासफेट दहा किलो या प्रमाणात मिसळून घ्यावे.  सुपरफासफेट चे द्रावण शिंपडून झाल्यानंतर थरावर सारख्या प्रमाणात टाकावे व नंतर आवश्यकतेनुसार पाणी घ्यावे.  अशा पद्धतीने थरावर थर देऊन खड्डा मातीने झाकून घ्यावा त्यामुळे खड्ड्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी उडून जाणार नाही.

आता दीड ते दोन महिन्यांनी खड्डा उघडा व त्यामध्ये सेंद्रिय पदार्थ चांगले आणखी मिसळून घ्यावे त्या वेळी थोडे थोडे पाणी शिंपडत रहावे खड्डा पुन्हा चिखल मातीने त्याच पद्धतणे बंद करुन घ्यावा.

द्रवरूप जिवाणू खते –                                                                                                                                                                अलीकडच्या काळात सध्या शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करत आहेत त्यामुळे त्यांनाही ठिबक सिंचनाद्वारे देणे अतिशय फायदेशीर ठरते द्रवरूप जिवाणू खतांमध्ये जीवाणूंचे प्रमाण अधिक आहेत त्यामुळेच त्यापेक्षा ही बाब शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारी आहे.

जीवाणू खते निर्माण झाल्यानंतर ती वापरण्याच्या पद्धती –

रोपे लागवड करत असताना एक बादली पाण्यामध्ये जिवाणूसंवर्धन टाकावे. असे जे मिश्रण चांगले ढवळावे व रोपांची मुळे या मिश्रणात ते बुडवून ठेवावी व नं मीतर ती लागवड करावी.

बिज प्रक्रियेतून नही रासायनिक खताचा वापर करता येतो हे जिवाणू संवर्धक पाण्यामध्ये मिसळून हळुवारपणे अशा पद्धतीने लावावे.  जेणेकरून सर्व बियाणास ते बसेल बियाण्याचा पृष्ठभाग खराब होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

शेतकरी शेतात मातीचा वापर करूनही जैविक खताचा वापर करू शकतात काही कारणामुळे जिवाणू खत देण्याच्या प्रक्रिया करायचे राहून गेले असते.  अशावेळी जिवाणू खत शेतात अंदाजे 20 ते 25 किलो बारीक मातीमध्ये मिसळून हे मिश्रण पिकांमध्ये हाताने टाकावे.  तसेच दोन लिटर द्रवरूप जिवाणू खत 50 किलो शेणखत मिसळून शेतामध्ये समप्रमाणात देता येते. ठिबक सिंचन या प्रकारे द्रवरूप जिवाणू जो खत दोन लिटर प्रति एकर या प्रमाणात ठिबक सिंचनातून पिकांना समप्रमाणात देता येते.

शेतकऱ्यांनी जीवाणु खत वापरतांना घ्यावयाची काळजी खालील प्रमाणे –

जिवाणूसंवर्धन लावलेली बियाणे रासायनिक खत किंवा इतर औषधांमध्ये मिसळू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. बुर जेशीनाशक कीटकनाशक लावायचे अगोदर अशी प्रक्रिया पूर्ण करून शेवटी मग जिवाणूखत लावून त्यांचा वापर करावा. जिवाणू संवर्धक बाटलीमध्ये किंवा पाकीटबंद असेल तर सूर्यप्रकाश उष्णता यांच्यापासून संरक्षण करावे ते नेहमीच सावलीत ठेवा किंवा कोरड्या जागेत ठेवावे.

ठिबक सिंचनाद्वारे द्रवरूप जिवाणू खते देण्याचे ठरवले असल्यास रासायनिक खत किंवा इतर औषधांमध्ये ते मिसळणार नाही याची संपूर्ण काळजी घेणे गरजेचे असते. अशाप्रकारे सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या नत्र स्थिर करणाऱ्या पूर्ण सुरत विरघळविणाऱ्या जिवाणू चा वापर शेतीसाठी केला तर शेतकऱ्यांना त्याचा भरपूर फायदा होऊन सेंद्रीय शेती योग्य ठरते कमीत कमी खर्चात जैविक खतांची jaivik sheti निर्मिती करून शेतकरी आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतात.

टोमॅटोचे सुधारित लागवड तंत्रज्ञान पहा click करा

Leave a Comment