group

Jamin Mojani जमीन कशीही असो तुम्ही स्वतः मोजणी करू शकता

शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमची जमीन Jamin Mojani घरच्याघरी मोजू शकता. जमीन मोजण्याचे सोपे उपाय जमिनीचा आकार कोणताही असो, फक्त तीला चार कोण असने किंवा चार बाजू असने गरजेचे आहे. जमिनीची मोजणी ही दोन पद्धतीने केली जाते. पहिली म्हणजे त्या जमिनीला चार बाजू आहेत.

Jamin Mojani जमीन कशीही असो तुम्ही स्वतः मोजणी करू शकता

अशा जमिनीची मोजणी आणि दुसरी पद्धत म्हणजे तीन बाजू असणारे जमीनिची मोजणी तर या दोन्ही प्रकारची जमीन मोजण्याची पद्धती तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुमची जमीन चौकोनी असो किंवा मग आयताकृती असो. इथे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून क्षेत्रफळ काढण्याची पद्धती पाहूया.

समजा तुमच्या जमिनीची एक बाजू 200 फूट आहे व दुसरी बाजू 300 फूट आहे. तिसरी बाजू 200 आणि चौथी बाजू 300 फूट आहे असे आपण गृहीत धरूया. या जमिनीचे क्षेत्रफळ आपण एका सूत्राच्या माध्यमातून काढूया. यासाठी तुम्ही तुमच्या शेताच्या बाजू मोजून घ्या.

आपल्याला समोरासमोरील बाजूंच्या सरासरी काढायचे आहे. 200+300=500 याची सरासरी काढायची आहे म्हणून त्याला दोनने भागायचे 500÷2=250= 250 फूट एवढी आपल्याला सरासरी मिळाली आहे. ही झाली आपली रुंदी. आता आपल्याला लांबी काढायची आहे. त्यासाठी सुद्धा अशाच प्रकारे आपल्या लागतात बाजूंची सरासरी काढायची आहे.

Read  Pradhan Mantri Fasal Bima Yojana: Crop Insurance PMFBY | प्रधानमंत्री पिक विमा योजना

संख्या समान असल्यामुळे त्याची सरासरी सुद्धा 250 फूट राहील. त्याचे क्षेत्रफळ काढण्याचे एक सूत्र आहे. चौकोनाचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी तर, आपली लांबी आलेली आहे 250 आणि रुंदी सुद्धा 250 आलेली आहे.
250 × 250= 62,500 चौ.फूट एवढे उत्तर येते.

जर आलेल्या संख्येला आपण 1089 ने भागले तर आपल्याला गुंठ्यामध्ये उत्तर मिळते. म्हणजे किती गुंठे आपल्याकडे शेती आहे हे आपल्याला कळून येईल. 62,500÷1089=57.39 एवढे उत्तर मिळते. म्हणजेच आपली जमीन जी आहे ती 57 गुंठे एवढी आहे. तरीही अगदी सोपी साधी पद्धत होती. चार बाजूसाठीही पद्धती होती.

उदा. जमिनीची लांबी 500 फुट व रुंदी 200 फुट आहे असे मानू
आता आपण क्षेत्रफळ काढूया त्यासाठी लांबी ×रुंदी = एकूण चौ.फुट क्षेत्रफळ हे सुत्र वापरु.म्हणजेच
500 × 200 = 100,000 चौरस फूट
आता या संख्येला एक गुंठा म्हणजेच 1089 चौ.फूट ने भाग देऊ.
100000 ÷ 1089 = 91.827
40 गुंठे = 1 एकर म्हणून
2 एकर 11 गुंठे 827 चौ.फूट हे क्षेत्रफळ

Read  PM Pik Vima Yojana 2022 | प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२२.

जर लांबी व रुंदी व रुंदी एकसमान नसेल तर त्यासाठी एक उपाय आहे.
उदा. जमिनीच्या एका बाजूची लांबी 510 तर दुसऱ्या बाजूची लांबी 500 आहे व एका बाजूची रुंदी 212 व दुसऱ्या बाजूची रुंदी 200 आहे तर त्या एकसमान करुन घ्या खालीलप्रमाणे…
लांबी
510 + 500 = 1010

1010 ÷ 2 = 505 लांबी

रुंदी
200 + 212 = 412
412 ÷ 2 = 206 रुंदी

आता या लांबी व रुंदी यांचा गुणाकार करा व आलेल्या संख्येला 1089 ने भाग द्या तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल.

505 × 206 = 104,030 चौ.फूट
104030 ÷ 1089 = 95.528
हे आले क्षेत्रफळ गुंठे व चौ.फूट मध्ये
1089 चौ.फूट = 1 गुंठा
43560 चौ.फूट = 40 गुंठे म्हणजेच 1 एकर

आता आपण जर तुमची जमीन Jamin Mojani जमीन कशीही असो तुम्ही स्वतः मोजणी करू शकता त्रिकोणी असेल किंवा तीन बाजूची असेल तर त्याचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते आपण पाहूया त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1\2×पाया×उंची आपण ज्यावेळेस करत असतो. तरीसुद्धा आपण लहानपणी आपल्या शाळेमध्ये शिकलेलंच आहोत. मग तुमची जमीन त्रिकोणाकृती असेल, तर पहिल्यांदा हाईट मोज्याची आणि नंतर त्याची पाया मोजायचा आणि या सूत्रांमध्ये तुमच्या जमिनीच्या पायाची लांबी आणि उंची टाका किंवा फुटामध्ये असेल तर ते टाका.

Read  जमिनीची सुपीकता कशी वाढवाल? जमिनीची देखभाल कशी कराल?

आपण एक उदाहरणाच्या सहाय्याने येथे सॉल करूया जमिनीचा पाया हा 200फूट आहे आणि त्याची उंची 500 फूट आहे. तर दोघांचा गुणाकार करून त्याला दोन्ही 2 ने भागायचे म्हणजेच
=500×200÷2
=100000÷2
=50000 चौ.फूट

आपल्याला उत्तर मिळते आता याचे जर आपल्या गुंठ्यामध्ये रूपांतर करायचे असेल तर याला पुन्हा 1089 ते भागयचं ते त्याचे उत्तर आपल्याला गुंठ्यामध्ये मिळून जाईल. 50000÷1089= 45.91गुंठे. अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या जमिनीचे मोजमाप करू शकता. जमिनीचा व्यवहार करताना किंवा जमिनीच्या इतर कामासाठी आपल्याला जमिनीचे क्षेत्र माहीत असणे आवश्यक असते.

महाराष्ट्रामध्ये गुंठा हे एकर जमीन मोजण्यासाठी जास्त वापरले जाते. त्यामुळे गुंठ्यामध्ये मोजणी करणे हे खूप कठीण काम नाही. कोणीही सातवी आठवी शिक्षण झालेला माणूस देखील या पद्धतीने जमिनीची मोजणी Jamin Mojani जमीन कशीही असो तुम्ही स्वतः मोजणी करू शकता करू शकतो.

Originally posted 2022-04-02 10:03:16.

group

Leave a Comment

x