Khapli Gahu Pik उत्पादकता वाढविण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागेल की, ज्यामुळे आपण गहू पिकाचे चांगले उत्पन्न मिळेल. जमिनीची उत्पादन क्षमता घटत चालली आहे. वाढवण्यासाठी काय करावे, असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल.
Khapli Gahu Pik गव्हाचे पीक लागवड
1) जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचसूत्रीचा वापर करायला पाहिजे. पंचसूत्री हवा, पाणी, माती, प्रकाश, पिकांच्या वाढीसाठी तसेच जास्त उत्पादन होणे गरजेचे असते. जमिनीतून पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पिकांची अल्टा पलट देखील करावी लागते.
2) शेतकऱ्यांने एकच एक पीक सतत घेतल्यामुळे जमिनीतील पोषक द्रव्य कमी होतात. ही पोषक द्रव्ये भरून काढण्यासाठी काही शेतकरी शेणखताचा देखील उपयोग करताना आपल्याला दिसतात. अनेक शेतकरी गव्हाचे उत्पादन काढत असतात. उत्पादन काढण्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक खतांचा वापर केला जातो.
3) त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत जाते. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की उत्पादन क्षमता कशाप्रकारे घटक जाते किंवा कोणत्या कारणांनी उत्पादन क्षमता घटते. हे जर आपल्याला कळलं तर त्यावर नक्कीच आपण उपाय करू शकतो आणि गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो.
Download Online Ration Card आता राशन कार्ड ठेवा मोबाईलमध्ये
4) Gahu Pik पेरणी अगोदर जमिनीची मशागत करणे गरजेचे असते. तसेच कोणत्या प्रकारची जमीन गव्हाच्या उत्पादनासाठी पोषक आहे. हे देखील आपल्याला माहिती असायला हवे. गव्हासाठी हलकी जमीन वापरली तर गव्हाचे उत्पादन हे घटते. कारण हलक्या जमिनीमध्ये गव्हाचे मुळे खोलवर जाऊ शकत नाही. त्यांना पोषकद्रव्ये सुद्धा मिळू शकत नाही.
5) हलक्या जमिनीमध्ये पोषक द्रव्य वरच्यावर असतात आणि मुळांना खाली पोषक द्रव्य न मिळाल्यामुळे उत्पादन क्षमता घटत जाते. गहू पेरणीच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहे. कोणी ट्रॅक्टरने गव्हाची लागवड करतात किंवा कोणी फेकून पेरतात, कोणी आणखीन दुसऱ्या पद्धतीने लागवडी करतात.
6) आपापल्या गरजेनुसार या गहू पेरणीच्या पद्धती आपल्याला माहिती आहेत. जर तुम्ही गहू फेकून गव्हाची लागवड केली, तर हे गहू कुठे पडतील आणि कशाप्रकारे उगवतील ते आपल्या सोयीनुसार पाहतात. परंतु उत्पादन घटत जाते त्यामुळे गहू पेरताना किंवा लागवड करताना, त्याची कोणत्या प्रकारे गव्हाची पेरणी करावी हे निवडणे गरजेचे असते.
7) Gahu Pik लावणी जरी महागत गेली तरी सुद्धा ती उत्पादन वाढवण्यासाठी गरजेचे आहे. त्यानंतर गहू पेरण्याचा कालावधी हा कोणत्या प्रकारचा असावा. हे देखील गव्हाच्या उत्पादनावर अवलंबून आहे. जर तुम्ही पेरणी चुकीच्या कालावधीत केली तर गव्हाचे उत्पादन घटीसाठी हे देखील एक कारण ठरू शकते.
8) बागायती गहू पेरायचं असेल तर नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा पोषक कालावधी आहे. त्यामुळे त्याच पंधरवड्यात तो पेरला गेला पाहिजे. जर बघायती शेती नसेल तर ऑक्टोबरचा दुसरा महिना गव्हाच्या उत्पादनासाठी पोषक आहे.
9) त्यानंतर जास्त उशीर किंवा जास्त जवळ कालावधी घ्यायला नको. जर ही तारीख किंवा वेळ मागे-पुढे व्हायला नको. ही वेळ जर मागेपुढे झाली तर त्यावर गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे ही काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
10) आणखीन एक गव्हाचे उत्पादन घटण्याची कारण म्हणजे गहू पक्का झाल्यानंतरही आपण कापण्यानीसाठी खूप वेळ लावतो. गहू वाळल्यानंतर, गहू परिपक्व झाल्यानंतरही आपण त्याची कापणी लवकर करत नाही. त्यामुळे गव्हाचे उत्पादन कमी होते.
11) Gahu Pik कापणी उशिरा करण्यामागे देखील भरपूर कारण असतात. काहीना मजूर लवकर मिळत नाही. तर काहींना वेळ मिळत नाही. परंतु याचा परिणाम गव्हाच्या उत्पादनात क्षमतेवर होत असतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जर या गोष्टींवर लक्ष दिले तर गव्हाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी सक्षम आहे.
आमच्या मी कास्तकार ब्लॉगला पण भेट द्या