कृषि कर्ज मित्र योजना Krishi Karj Mitra Yojana राज्य शासनाच्या माध्यमातून 21 ऑक्टोबर 2021 रोजी एक शासन निर्णय घेऊन ही योजना राज्यामध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो या लेखामध्ये आपण कृषी कर्ज योजना काय आहेत या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठला लाभ मिळेल याची सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घेऊया.
शासन निर्णय मध्ये सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी कर्ज मित्र योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयीकृत बँका असतील सहकारी तसेच खाजगी बँका व पतसंस्था मार्फत मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा केला जातो यामध्ये ही शेतकर्यांचा कल हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे जास्त असतो. सहकारी बँकांकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत कर्जाचे वितरण केले जाते.
शासन निर्णय
Table of Contents
शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषिकर्ज मित्र योजना खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे
योजनेचा उद्देश
शेतकर्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने व विनाविलंब होण्यासाठी सहाय्य करणे व त्याद्वारे भांडवलाची गुंतवणूक वाढून कृषी क्षेत्राचा विकास साधने
योजनेचे स्वरुप
दरवर्षी खरीप रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात लागवडीखालील क्षेत्र व एकूण कर्ज वाटप पाहिले असता यात विषमता आढळून येते कृषिक्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात अधिकची भर पडणे आवश्यक आहे सूक्ष्म निरीक्षण केल्यास तेच ते लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याने दिसून येते यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो या शेतकऱ्यांनी व्यतिरिक्त ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे परंतु कर्ज प्रक्रियेचे अज्ञान असल्यामुळे व वेळेच्या अभावामुळे कर्ज मिळणे शक्य होत नाही अशा इच्छुक पात्र शेतकर्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणीनुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना प्रशिक्षित स्वयंसेवकांच मदत किंवा सहाय्य देणे गरजेचे आहे.
ही बाब लक्षात घेऊन कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू पात्र शेतकऱ्यास या बाबींसाठी कर्ज आवश्यक आहे अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र यांच्या साह्याने तयार केल्यास शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होईल.
प्रति प्रकरण सेवाशुल्कचा दर
अ) अल्प मुदतीचे कर्ज-
1. प्रथमतः पीक कर्ज घेणारा शेतकरी प्रति प्रकरण सेवाशुल्क रुपये 150
ब) मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज-
1. नवीन कर्ज प्रकरण- प्रति प्रकरण सेवा शुल्क रुपये 250
2. कर्ज प्रकरणाचे नूतनीकरण- प्रति प्रकरण सेवा शुल्क रुपये 200
कृषी कर्ज मित्र नोंदणी
अ) कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
ब) दोन्ही झालेल्या इच्छुक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.
क) जिल्हा परिषदेकडील कृषी समिती अंतिम निवडीचे अधिकार राहतील.
कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती द्यावी कृषिकर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून मंजुरीसाठी बँकेमध्ये सादर करेल कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्यातील मध्यस्थी च्या भूमिका ऐवजी सहाय्यक व सल्लागाराची भूमिका बजावेल.
कृषी कर्ज मित्राने पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्या सहाय्य व सल्ला देणे या विषयी बंद पत्र देणे आवश्यक आहे.
योजनेचा कालावधी
सदर योजनेचा कालावधी हा सन 2021 – 22 हे आर्थिक वर्ष राहील आवश्यक आवश्यकतेनुसार योजनेचा कालावधी कमी करणे किंवा वाढवण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला राहतील.
21 ऑक्टोबर 2021 चा शासन निर्णय बघा