Kukkutpalan Yojana 2022 कुकुट पालन योजनेमध्ये 5 लाखापर्यंत चे अनुदान…..महाराष्ट्र कुक्कुटपालन अनुदान योजना 2022 कुक्कुट पालन या व्यवसाय करता 5 लाख 13 हजार रुपये पर्यंत अनुदान देणारी एक महत्त्वाची बातमी आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत. आपण यापूर्वी वेळोवेळी अशाच योजनेबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही योजना 302 तालुक्यामध्ये ही राबवली जाते. ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये या योजनेसाठी नवीन अर्ज मागवले जातात, त्याच्या बद्दलची अपडेट मिळाल्यानंतर लेखाच्या माध्यमातून आपण हे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कुक्कुट पालन योजना कोल्हापूर 2022 :
Table of Contents
2021-22 या वर्षांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील तीन तालुक्यांकरिता हातकणंगले, शिरोळ, कागल व चंदगड, पन्हाळा तालुक्यातील लाभार्थी निवडीसाठी पात्र लाभार्थी कडून दिनांक 25 फेब्रुवारी ते 11मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज मागविण्यात येणार आहे आणि यासाठी कोल्हापूर तालुक्यातील लाभार्थी अर्ज करू शकतात.
मित्रांनो, आता याच योजनेकरता कोल्हापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांची अर्ज मागविण्यात आलेले आहे आणि पोस्टच्या माध्यमातून हा अर्ज कधी करायचा? कुठे करायचा? याच्यासाठी अटी शर्ती पात्रतेचे निकष काय आहेत? त्याप्रमाणे लागणारे कागदपत्र या सर्वांबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो माहिती समजून घेण्याकरता पुढील लेख शेवटपर्यंत वाचा.
महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेचा लाभ मिळविण्यासाठी, सर्व इच्छुक व्यक्ती ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि कर्जाची रक्कम मिळवू शकतात. कर्जाची रक्कम कशी मिळवायची, कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यायचे, कोणती कागदपत्रे लागतील ही माहिती आपण सविस्तर पाहूया.
कुक्कुट पालन योजना पात्रता 2022 :
या योजनेसाठी सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती उपयोजना व जनजाति क्षेत्रे उपयोजन या जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत. ज्या लाभार्थ्यांनी उबवणूक यंत्र आहेत अशा शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येत असते. कुक्कुटपालन व्यवसायात स्वयम रोजगार निर्मितीचे आवड असणाऱ्या नवउद्योजक यास योजनेसाठी अर्ज करू शकतात. प्रकल्प कार्यान्वित करण्यात करता लाभार्थ्यांना आवश्यक असणारी साधने सुविधा व संपूर्ण माहिती पडताळून लाभार्थ्याची निवड करण्यात येते. तसेच योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील लाभार्थी घेऊ शकतात म्हणजेच अर्ज करू शकतात.
कुकुट पालन योजना 2022 अनुदान किती मिळणार?
या योजनेत फक्त महाराष्ट्र राज्यातील लोकच अर्ज करू शकतात. सदन कुक्कुट विकास गटांची स्थापना या योजनेअंतर्गत प्रकल्पाच्या एकूण 10 लाख 27 हजार 500 रुपये तर सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान दिले जाते. तरी या योजनेचा 50 टक्के हिस्सा हा स्वतः राहणार आहे किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन आपण उभा करू शकता.
लाभार्थी किंवा शेतकरी यांची अर्ज करण्याची वयोमर्यादा ही 18 ते 60 वर्षे राहिल्या व मर्यादित सर्वच प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. जर एखादी व्यक्ती शेळीपालन, मत्स्यपालन इत्यादी व्यवसाय करत असेल तर तो व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांना शेती तसेच कुक्कुटपालन करायचे आहे ते या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
कुक्कुटपालन करणाऱ्याकडे स्वतःच्या जमिनीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. राज्यात अगोदरच पोल्ट्री फार्म असलेल्या शेतकऱ्यांना काम करण्यासाठी कर्ज मिळू शकते.
कुकूटपालन योजना 2022 फायदे :
या योजनेमुळे शेतकऱ्यांना तसेच लाभार्थ्यांना ही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याने किंवा ही योजना सुरू झाल्याने शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार असून, ते शेतीसोबतच कुक्कुटपालनही करू शकतात.
पोल्ट्री फार्म उघडल्यानंतर व्यक्ती मांस, अंडी इत्यादी कामे करू शकते.
या कुक्कुटपालन कर्ज योजनेचा लाभ राज्यातील जनतेला कोणत्याही त्रासाशिवाय घेता येईल. यासह व्यक्तींना इतर कोणत्याही व्यक्तीकडून कर्ज घेण्याची आवश्यकता नाही.
ही योजना सुरू झाल्यामुळे लोकांना रोजगार मिळेल आणि लोक स्वतःच्या राज्यात स्वतःचे काम सुरू करतील.
कुक्कुटपालन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
1) अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
2) रहिवासी प्रमाणपत्राची प्रत
3) मतदार ओळखपत्राची छायाप्रत
4) कुटुंब शिधापत्रिका
5) ग्राउंड पेपर
6) बँक खाते क्रमांक
7) मोबाईल नंबर
8) पासपोर्ट आकाराचा फोटो.
9) कुकुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र
10) अनुसूचित जाती जमाती अर्जदारा करिता जातीच्या दाखल्याची सत्यप्रत. हे सर्व कागदपत्र अर्जासोबत जोडायचे आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन व उपायुक्त तसेच तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे आपनास संपर्क करायचा आहे. याठिकाणी योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्यायचे आहे परंतु ही माहिती केवळ कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुरू असून याची सर्वांनी नोंद घ्यावी.
Kukkutpalan Yojana 2022 ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे नक्की वाचा – बायोग्राफी आणि आई मराठी