Mahavitaran Agriculture Pump Bill 30% Subsidy | कृषी पंप थकबाकी भरणाऱ्यांना 30% सूट

Mahavitaran Agriculture Pump Bill 30% Subsidy महावितरणचे पुणे प्रादेशिक विभागामधील कृषी पंप विज ग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता वसुली होणे गरजेचे असल्यामुळे राज्य सरकारने नवीन कृषी पंप धोरण 2020 तयार केले आहे या माध्यमातून 31 मार्च 2023 पर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांकरिता थकबाकी वर 30% सूट देण्याची योजना सरकारने आखली आहे.

व्याज आणि विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेणे गरजेचे आहे असे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी म्हटले आहे. कोल्हापूर मंडळामध्ये एक लाख 46 हजार थकबाकीदार आहेत थकीत आणि चालू बिलाची एकूण रक्कम १९८२ कोटी रुपयांची आहे. सर्वाधिक थकबाकी सोलापूर मंडळामध्ये असल्याचे आकडेवारी समोर आले आहे.

Read  Talathi Mandal Adhikari Bharti 2023 | तलाठी व मंडळ अधिकारी भरती

थकबाकीचा बोजा

डिसेंबर 2022 पर्यंत पुणे महावितरण प्रादेशिक विभागातील बारा लाख 54 हजार कृषी पंप वीस ग्राहकांची थकबाकी 1261 कोटी रुपयांवर आहे राज्य सरकारच्या नवीन कृषी पंप धोरणामध्ये अंमलबजावणी जानेवारी 2021 पासून करण्यात येत आहे जानेवारी 2021 ते 2022 पर्यंत यावर 50% सूट देण्यात आली होती. एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेवर एकूण 30 टक्के सूट देण्यात येणार आहे त्यामुळे विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे असं सांगण्यात आलं.

Parul Arora Age, Biography, Birthdate, Wikipedia,Inatagram and More 2022

सर्वात जास्त थकबाकीदार

सोलापूर महावितरण मध्ये सर्वात जास्त कृषी पंप ग्राहक थकबाकीदार आहेत त्यांची संख्या तीन लाख 68 हजार असून चालू आणि थकीत बिलाची एकूण थकबाकी ही 5338 कोटी रुपयांची आहे तर सांगली मंडळामध्ये दोन लाख 40 हजार कृषी पंप ग्राहक थकबाकीदार असून चालू आणि थकीत बिलाची एकूण थकबाकी ही 1576 कोटी रुपयांची आहे.

Read  Us Lagwad Sugarcane Fertilization |उसाची लागवड

बारामती मध्ये एक लाख 88 कृषी पंप ग्राहक थकबाकीदार असून चालू आणि थकीत बिलाची रक्कम 2379 कोटी रुपयांची आहे सातारा मंडळामध्ये 1 लाख 84 हजार कृषी पंप ग्राहक थकबाकीदार असून चालू आणि थकीत बिलाची एकूण रक्कम 1000 कोटी रुपये आहे तसेच पुणे ग्रामीण मंडळामध्ये एक लाख वीस हजार कृषी पंप ग्राहक थकबाकीदार असून थकीत व चालू बिलाची एकूण थकबाकी ही 1138 कोटी रुपयांची आहे.

राज्यामध्ये कृषी पंपाचा वापर सर्वांत जास्त हा पुणे प्रादेशिक विभागामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पाच जिल्ह्यात आहे या पाचही जिल्हांमध्ये कृषी पंपासाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो भाजीपाला, फळबाग, ऊस, फुल शेती याकरता विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होऊन वीज भरण्यास टाळाटाळ होत आहे.

Read  PM Kisan Yojana New Rules 2024 | पी एम किसान योजना नवीन नियम २०२४ .

कोल्हापूर मंडळ हे राज्यामध्ये वीज बिले वसुलीमध्ये अव्वल स्थानात मानल्या जाते. त्यामुळे कोल्हापूर परिमंडळात वीज बिलांची वसुली करिता वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रसंग कमी येतात जवळपास महावितरण चे अडीच लाख वीज ग्राहक आहेत यामध्ये नियमित वीज बिल भरण्याचे प्रमाण 84 टक्क्यांवर आहे. औद्योगिक व्यावसायिकांवर मात्र वीज बिल थकबाकीचे प्रमाण अलीकडच्या काळामध्ये वाढलेले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Leave a Comment