पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग महाविद्यालयाला “राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद” टीम ची भेट

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग महाविद्यालयाला “राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद” टीम ची भेट

मलकापूर : लोकसेवा बहुउद्देशीय मंडळ, मलकापूर शिक्षण संस्था संचलित पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग महाविद्यालयाला अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे “राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद” अर्थातच टीम ची भेट नुकतीच पूर्ण झाली आहे. भारतात उच्च शिक्षणाची गुणवत्ता प्रमाणित करण्याची सुरुवात उदारीकरणानंतर सुरू झाली. विशेषत: नॅक या स्वायत्त संस्थेची स्थापना १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आराखडयातील ‘उच्च शिक्षणातील गुणवत्तेचा ऱ्हास’ या शीर्षकाखाली अहवाल व कृती कार्यक्रम १९९२ नुसार झाली. ही संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चालते. ती स्वायत्त असून विद्यापीठे आणि महाविद्यालयाच्या कामगिरीचे मूल्यांकन व प्रमाणिकरण करते. शैक्षणिक गुणवत्ता सुधारणेला प्रोत्साहन देण्याबरोबरच उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची क्षमता, साधने, संधी संवर्धित करण्यासाठी प्रोत्साहित करते. ही प्रक्रिया स्वःअध्ययन महाविद्यालयाने नॅककडे सादर केलेला एसएसआर- सेल्फ स्टडी रिपोर्ट अहवाल आणि प्रत्यक्ष भेट याद्वारे पूर्ण केली जाते. ही भेट कोलते इंजिनिअरिंग मध्ये दिनांक १८ जानेवारी व १९ जानेवारी २०२४ ला पूर्ण झाली. यामध्ये नॅक मार्फत उत्तरप्रदेश राज्यातील अलिगढ युनिवर्सिटी येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक डॉ. इम्प्तियाज चेअरमन म्हणून तर मेंबर ऑफ कोओर्डिंनेटर म्हणून याच राज्यातील कानपूर युनिवर्सिटी येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक डॉ. यदूवीर सिंह तसेच कर्नाटका राज्यातील बंगलोर युनिवर्सिटी येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक डॉ. केम्पे यु. एन. यांची मेंबर म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

Read  शालेय राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल सात खेळाडूंची निवड रायपूर छत्तीसगड येथे होणार राष्ट्रीय स्पर्धा

 

भारतात उच्चशिक्षणाची गुणवत्ता टिकावी यासाठी नॅक ही संस्था कार्यरत आहेत. सध्या २०२० च्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणव्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. युनोच्या एसडीजी-४ (२०१५) धोरणानुसार सर्व सभासद देशांना सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह करण्यात आलेला आहे. या सर्व संस्थांची मार्गदर्शक तत्त्वे समोर ठेवून नॅकच्या वतीने भारतातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थाचे मूल्यांकन व प्रामाणिकरण करण्याच्या प्रक्रियेचा ३० वर्षांचा टप्पा पूर्णत्वाकडे जात आहे. या कालावधीत आतापर्यंत नॅककडून ९,८५२ उच्चशिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचे व संस्थांचे मूल्यांकन झाले आहे. तेवढ्याच संस्था मूल्यांकनाच्या बाहेर आहेत. या मूल्यांकनाच्या प्रक्रियेत देशात महाराष्ट्र आघाडीवर असून मूल्यांकन पूर्ण झालेल्या २० टक्के संस्था महाराष्ट्रातील आहेत. आणि यामधील एक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज आहे. अशी माहिती यावेळी कोलते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी दिली.

Read  महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन;

 

या नॅक भेटी दरम्यान कोलते महाविद्यालयाचे चेअरमन श्री. डी. एन. पाटील उपाख्य नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदीप कोलते,सचिव डॉ. अरविंद कोलते सह श्री. सुधीर पाचपांडे, श्री. देवेंद्र पाटील, श्री. अनिल इंगळे यांचा समावेश होता. नॅक कमिटीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्युएसी कोओर्डिंनेटर प्रा. रमाकांत चोधरी, अॅकडमिक डीन प्रा. नितिन खर्चे, संतोष शेकोकार, संदीप खाचणे, योगेश सुशीर, राजेश सरोदे, सुदेश फरफट, मो. जावेद, प्रणव फिरके, सचिन भोळे, जयप्रकाश सोनोने, महेश शास्त्री, साकेत पाटील, पांडुरंग चोपडे, पराग चोपडे, पी. के. पाटील, योगेश जाधव, मनोज वानखेडे, सचिन चौधरी, सचिन बोरले सह लायब्ररी इन्चार्ज प्राध्यापिका संगीता खर्चे, तेजल खर्चे, मंजिरी करांडे, स्नेहल पवार, मयूरी पाटील आदि सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका तसेच शिक्षकेतोत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Leave a Comment