Moti Sheti – शेतकरी मित्रांनो जर आपल्याला थोडे पैसे गुंतवून एखादा चांगला व्यवसाय सुरू करायचा असेल, तर मी तुम्हाला या लेखांमध्ये एक चांगला व्यवसाय बद्दल माहिती देणार आहे तुम्ही हा व्यवसाय फक्त 30 हजारांमध्ये सुरू करू शकता आणि चांगला नफा सुद्धा कमवू शकता.
Moti Sheti मोत्याची शेती
Table of Contents
यामधील जमेची बाब म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला सरकारकडून 50 टक्के अनुदान सुद्धा मिळेल. आजकाल मोत्यांच्या शेतीकडे लोकांचे लक्ष झपाट्याने वाढलेले दिसते. अनेक लोक त्याची लागवड करून करोडपती झालेले आहेत आणि त्यामुळे आपण या लेखांमध्ये मोत्याच्या व्यवसाय बद्दल जाणून घेऊयात.
मोत्याच्या शेती करता काय आवश्यक आहे?
याकरता शेतकरी मित्रांनो एका तलावाची आवश्यकता आहे ऑयस्टर म्हणजेच ज्या पासून मोती बनतात. आणि ह्या करता लागेल आपल्याला प्रशिक्षण अशा प्रकारे मोत्याचि लागवड करण्याकरता आपल्याला ह्या तीन गोष्टी आवश्यक आहेत जर आपण मोत्याची शेती करू इच्छितो असल्यास स्वखर्चाने खोदलेले तलाव आपल्याला तयार करावे लागेल. किंवा सरकार यासाठी आपल्याला 50 टक्के सबसिडी देते आपण त्या योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकता.
ऑयस्टर हे भारतातील बऱ्याच राज्यात आढळतात. दक्षिण भारत आणि बिहारमध्ये दरभंगा च्या ऑयस्टर ची गुणवत्ता चांगली असली तरी त्याच्या प्रशिक्षणासाठी देशांमध्ये बऱ्याच संस्था आहेत. मध्य प्रदेशातील होशंगाबाद आणि मुंबई येथून मोत्याचे प्रशिक्षण दिले जात असते.
मोती कसे बनतात?
सुरुवातीला ऑयस्टरांना जाळीमध्ये बांधला जात असते आणि दहा ते पंधरा दिवस तलावांमध्ये ठेवल्या जाते जेणेकरून ते त्यानुसार त्यांचे वातावरण तयार करू शकतील त्यानंतर त्यांना बाहेर काढले जाते आणि शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रिया काय आहे तर ऑयस्टारच्या आत एक कण किंवा साच्या घातला जातो या बुरशीवर कोटिंग केल्यानंतर ऑयस्टर थर बनविला जातो नंतर मोती बनत असतो.