Mukhyamantri Saur Pump Krishi Pump Yojana 2023 | मुख्यमंत्री सौर पंप कृषी पंप योजना 2023.
Table of Contents
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेती ही फायदेशीर ठरावी याचे शाश्वती व्हावी तसेच राज्यातील शेतकरी सन्मान आणि सुखी व्हावा असे महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना धोरणे नियोजनबद्ध पद्धतीने राबवत आहेत. याच धोरणांचा अवलंब करून शेततळे योजना, सौर कृषी पंप योजना यासारख्या शासन योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी हिताचा विचार करून या योजनांची अंमलबजावणी करत आहेत. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप स्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे सौर ऊर्जा हा ऊर्जेचा शाश्वत आणि अखंड स्त्रोत आहे. भारतासारख्या देशांमध्ये आठ महिने क** ऊन असते त्यामुळे निसर्गाकडून मिळालेल्या या निरंतर ऊर्जेच्या स्त्रोताचा वापर सौ कृषी पंपाच्या माध्यमातून वापरून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याच्या ठरू शकतात. त्याचप्रमाणे पारंपारिक ऊर्जेचे स्त्रोत निसर्गामध्ये अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत तसेच त्यांचा अत्यंत वापर झाल्यामुळे निसर्गामध्ये असमतोल निर्माण झाला आहे. शेतीसाठी पाण्याचे अत्यंत महत्त्व आहे. आणि ते मिळविण्यासाठी विजेची गरज असते ही वीज जर अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतापासून म्हणजे र ऊर्जेतून मिळविण्यात आली तर देश शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याचे आहे तसेच यामुळे निसर्गाचा समतोल सुद्धा साधला जाईल. Mukhyamantri Saur Pump Krishi Pump Yojana 2023 | मुख्यमंत्री सौर पंप कृषी पंप योजना 2023.
जीवनासाठी पाणी अत्यंत आवश्यक असते तसेच शेतीसाठी सुद्धा असते आणि पाणी मिळवण्यासाठी विजेची आवश्यकता असते वीज निर्मितीसाठी नैसर्गिक साधन व खजिनांचा अत्याधिक वापरामुळे वातावरणात प्रदूषण निर्माण झाले आहे त्यामुळे वातावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने व वीज निर्मितीची सध्याची स्थिती विचारात घेऊन राज्य शासनाने पारंपारिक व पर्यावरण पूरक ऊर्जा स्त्रोत विकसित करण्याचे धोरण जाहीर केले आहे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांमध्ये सौर ऊर्जा म्हणजे शाश्वत आणि निरंतर उपलब्ध असलेली ऊर्जा स्त्रोत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सौर ऊर्जाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्याची सौर कृषी पंप देण्याची योजना आखली आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेची अंमलबजावणी शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केली आहे तसेच शेतकरी वापरत असलेले पारंपारिक विजेवर चालणारे कृषी पंपांना पुरवठा होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामध्ये वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होतो तांत्रिक वीज हानी वाढते रोहोत्र बिघाड होण्यासाठी होण्यामध्ये वाढ विद्युत अपघात विद्युत चोरी यासारख्या समस्यांमुळे अखंडित व शाश्वत विद्युत पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात याशिवाय जिथे विद्युत पुरवठा उपलब्ध नाही अशा ठिकाणी शेतकरी डिझेल इंधनाचा वापर करून कृषी पंप चालविताना जे त्यांना डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अत्यंत महागात पडते पर्यायाने या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते याला पर्याय म्हणून सौर कृषी पंप राज्याचे शेतकऱ्यांना सौ कृषी पंप उपलब्ध करून दिल्यास त्वरित सर्व समस्यांवर मात करता येईल. Mukhyamantri Saur Pump Krishi Pump Yojana 2023 | मुख्यमंत्री सौर पंप कृषी पंप योजना 2023.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची वैशिष्ट्ये :-
महाराष्ट्र राज्यात सौर कृषी पंप योजना राबविण्यात संदर्भात घेतलेल्या नेण्यासाठी राज्य शासनाद्वारे राज्यात एक लाख व सौर कृषी पंप प्रस्थापित करण्यासाठी विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतूद व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थ्यांकरिता विशेष घटक योजना आदिवासी उपाययोजना अंतर्गत निधीचा वापर करून नवीन सौर पंप योजना करण्यास मान्यता दिली आहे शेतकऱ्याला दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे त्याचप्रमाणे राज्य शासनाची पारंपारिक पद्धतीने सबसिडी सबसिडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचत करण्याचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी सिंचनासाठी एक लाख सौर कृषी पंप टप्प्याटप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश आहे
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाची योजना आहे या योजनेच्या अंतर्गत पुढील तीन वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने एक लाख सौ कृषी पंप स्थापित करण्याचा शासनाचा उद्देश आहे
1) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार सौर कृषी पंपाच्या किमतीच्या 95 टक्के अनुदान देणार आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांना पाच टक्के रक्कम भरावयाचे आहे.
2) या योजनेअंतर्गत पाच एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना थ्री एचपी पंप देण्यात येतील आणि पाच एकर पेक्षा अधिक शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एचपी आणि 7.5 एचपी पंप देण्यात येतील.
3) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची उद्दिष्टे :-
राज्याच्या अनेक भागातील शेतकरी आजही शेती सिंचनासाठी डिझेल पंप किंवा इलेक्ट्रॉनिक पंप वापरतात यामध्ये दुर्गम भागातील शेतकरी डिझेल पंप उपयोगात आणतात डिझेल पंप महागात असतात तसेच डिझेलचे भाव सुद्धा वाढत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी बराच खर्च करावा लागतो या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते शेतकऱ्यांना या नुकसानापासून वाचवण्यासाठी त्यांचा शेती सिंचनाचा प्रश्न मिटवणे त्याचबरोबर पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा करणे हा उद्देश ठेवून शासनाने ही योजना सुरू केली आहे.
महाराष्ट्र राज्यात ही योजना राबवीत असताना विशेषतः विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तसेच अतिदुर्गम भागांमधील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणार आहे. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांनी भरावयाचा हिस्सा कमीत कमी ठेवून उर्वरित रक्कम वित्तीय संस्थेमार्फत कर्ज स्वरूपात देता येईल आणि या कर्जाची परतफेड महावितरण कंपनी द्वारे टपाटप्याने करण्यात येईल या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा हिस्सा सर्वसाधारण लाभाच्या करिता सौ कृषी पंपाच्या केंद्रीय अल्पभूधारक किमतीच्या दहा टक्के आणि अनुसूचित जाती जमातीसाठी पाच टक्के अनुदान दिल्या जाईल.
महाराष्ट्र सौ कृषी पंप योजना 2023 मध्ये लाभार्थी पात्रता कशी राहील ?
महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे त्यामुळे या योजनेसाठी शासनाने लाभार्थ्यांसाठी पात्रता निकष ठरवून दिली आहे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही पात्रता निकष माहिती असणे आवश्यक आहे या योजनेचे पात्रता निकष खालील प्रमाणे आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहेत असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील मात्र या शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन आवश्यक आहे
या योजनेअंतर्गत पाच एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन एचपी सह कृषी पंप आणि पाच एकरांपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एचपी सौर कृषी पंप देण्यात येतील
या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसलेले शेतकरी तसेच विद्युत विद्युत करण्यासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवले नसलेले शेतकरी महावितरण कंपनीकडे विद्युत कनेक्शन साठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत कनेक्शन मिळणे शक्य नाही असे शेतकरी आर्ती दुर्गम भागातील शेतकरी महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजना अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना सदर योजने अंतर्गत प्राधान्य राहील.
योजनेच्या अंतर्गत सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून दहा टक्के आणि अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के अशाप्रकारे लाभार्थीस्सा भरणे आवश्यक असेल.
वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारी शेतजमीन असणारे शेतकरी सुद्धा योजनेस पात्र ठरतील.