New Education Policy School Admission Age Criteria नवीन वर्षात शाळेच्या प्रवेशात कसा बदल झाला… कोणत्या वयात कोणत्या मुलांना मिळणार शाळेत प्रवेश जाणून घ्या…..
मुलांना शाळेतील प्रवेशासाठी एक वय निश्चित करण्यात आले. शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित करण्यासाठी 18 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार 31 डिसेंबर हा मानिव दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून मानवी दिनांक बदलामुळे संबंधित विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्षात सन 2022-2023 साठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे.
शाळांना पूर्वप्राथमिकसाठी कमी-जास्त वयाची कारणे देऊन प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही. 2022-2023 या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशासाठी 31 डिसेंबर 2022 अखेर प्रवेशासाठी निश्चित असलेले वय असावे लागणार आहे, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी सोमवारी 28 फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे. किती वर्षासाठी पूर्वप्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश द्यावा, हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नर्सरी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुलांचं वय किती असावं हा काही गेल्या वर्षांपासून चाललेला घोळ अखेर सरकारने मिटवला आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय किती असावे, याविषयी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सुधारित परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
यानुसार प्ले ग्रुप, नर्सरीसाठी 4 वर्ष 5 महिने, ज्युनिअर केजीसाठी 5 वर्ष 5 महिने, सीनिअर केजी 6 वर्ष 5 महिने आणि पहिलीसाठी 7 वर्ष 5 महिने वय आवश्यक असणार आहे. याआधी प्ले ग्रुप, नर्सरीसाठी 3 वर्ष, ज्युनिअर केजीसाठी 4 वर्ष, सीनिअर केजीसाठी 5 वर्ष आणि पहिलीसाठी 6 वर्ष वय होतं. त्यात आता मात्र बदल करण्यात आला आहे.
जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये अडचणी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्यामुळे आता शाळांना पूर्व प्राथमिकसाठी कमी-जास्त वयाचं कारण देऊन प्रवेश नाकारता येणार नाही.
10 मार्चपर्यंत मुदतवाढ :
आरटीई प्रवेशाच्या अजार्साठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शाळांना आरटीई प्रवेशाच्या नोंदणीसाठी वेळ लागल्यामुळे अनेक पालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्याचे संचलनालयाच्या लक्षात आले. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन त्यांची प्रवेशाची संधी त्यांना मिळावी. यासाठी आरटीई प्रवेशाच्या अजार्साठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आतापर्यंत 5766 अर्ज सादर
आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू असून जिल्ह्यातील 285 शाळांमधील 3 हजार 147 जागांसाठी आतापर्यंत 5 हजार 766 पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले आहे.
New Education Policy School Admission Age Criteria ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.