Pantpradhan Shramyogi Mandhan Yojana पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना

Pantpradhan Shramyogi Mandhan Yojana – आपल्या आयुष्यातील उतारवयात मध्ये निवृत्तीवेतन हा प्रमुख आर्थिक आधार मानला जातो या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कडून अनेक अशा निवृत्तीवेतन योजना राबविल्या जात असतात यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना Pantpradhan Shramyogi Mandhan Yojana.

या योजनेच्या माध्यमातून तुम्ही फक्त दिवसाला एक रुपये 80 पैसे जमा करून म्हातारपणी वर्षाला 36 हजाराची पेन्शन मिळू शकता. केंद्र सरकारची ही योजना असंघटित क्षेत्रांमधील कामगारांसाठी उपयुक्त आहे समजा तुमचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुमचे महिन्याचे उत्पन्न पंधरा हजार रुपये असेल तर पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना तुमच्यासाठी फायदेशीर आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला म्हातारपणी महिन्याला तीन हजार रुपयाची पेन्शन मिळेल.

Read  ई-श्रम कार्ड e-Shram Card

केंद्र सरकारकडून ही योजना 2019 मध्ये सुरु करण्यात आली येत्या पाच वर्षांमध्ये असंघटित क्षेत्रामधील दहा कोटी कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा अशा प्रकारचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे.

ही केंद्र सरकारची योजना असल्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे व याची साठी ओलांडल्यानंतर तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत तुम्ही महिन्याला जितके पैसे जमा कराल तेवढे पेन्शन भविष्यामध्ये मिळेल.

जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर याकरता काही अटी आहेत तुमचे मासिक उत्पन्न हे पंधरा हजार रूपये पेक्षा जास्त असू नये. त्याचप्रमाणे संघटित क्षेत्रातील भविष्य निर्वाह निधी तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना किंवा राज्य कर्मचारी विमा निगम या योजनांचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना पैसे गुंतवता येणार नाहीत.

Read  Nashik Bharti Maharashtra 2022 | नाशिक भरती महाराष्ट्र २०२२ .

कोणा करता ही योजना आहे?

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजने मध्ये कोणत्याही भारतीय व्यक्तीला येता येणार आहे. त्याकरता तुमचे वय 18 ते 40 इतक्या वयोगटातील असायला पाहिजे. विशेषता यामध्ये चांभार, शिंपी, धोबी, रिक्षाचालक तसेच मजुर वर्गाला डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आलेली आहे, सद्यस्थितीला देशातील असंघटित क्षेत्रामध्ये साधारणतः 42 कोटी कामगार आहेत.

वयाच्या 18व्या वर्षापासून महिन्याला 55 रुपये 29व्या वर्षापासून महिन्याला 100 रुपये आणि 40 व्या वर्षाच्या वयापासून महिन्याला 200 रुपये जमा करणे अपेक्षित आहे. पेन्शन मिळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला तर 50 टक्के हिस्सा त्याच्या पती किंवा पत्नी ला मिळेल.

या योजने करता लागणारी कागदपत्रे

या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याकरता जनधन खाते आधार कार्ड मोबाईल क्रमांक या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जीवन विमा निगम LIC ची शाखा राज्य कर्मचारी विमा निगम ESIEC किंवा इ पी एफ ओ EPFO मध्ये जाऊन तुम्हाला या योजनेकरीता अर्ज करता येणार आहे.

Read  12th Maharashtra State Board Examination 2022 Hall Ticket | 12वी परीक्षा हॉल तिकीट

Pantpradhan Shramyogi Mandhan Yojana हा लेख कसा वाटला नक्की कमेंट करा आणि हो आमच्या हिंदी निबंध Essay In Hindi आणि आई मराठी Aai Marathi या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

 

Leave a Comment