PM Kisan Samman Nidhi पी एम किसान सम्मान निधी

शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी PM Kisan Samman Nidhi चा आठवा झालेला आहे.  काही शेतकऱ्यांना 8वां काही शेतकऱ्यांना 7वा काही शेतकऱ्यांना 5 वा काही शेतकऱ्यांना 6वां असे हप्ते मिळालेले आहेत.

ज्या शेतकऱ्यांना नवीन रजिस्ट्रेशन केलं होतं नवीन नोंदणी केली होती. त्या शेतक-यांना तिसरा चौथा हप्ता मिळाला मिळाला नाही तर दुसरा मिळाला नाही किंवा काही जणांना नवीन नोंदणी केलेली आहे. त्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता आलेला नाही तर,  मित्रांनो अशा लाभार्थ्यांचे नाव पी एम किसान सन्मान निधी PM Kisan Samman Nidhi च्या यादी मध्ये अपात्र शेतकऱ्यांची यादी आहे. पात्र – अपात्र शेतकऱ्यांच्या यादी मध्ये नाव  पहाण्याचा प्रयत्न करत असाल तर आपणास त्यासाठी पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन pmkisan.gov.in या संकेतस्थळावरती जायचं आहे.

Mhani in Marathi करीता येथे क्लिक करा

पोर्टल वर आल्यानंतर मुख्यपृष्ठावर खाली गेल्यानंतर पाहू शकता ते सपोर्ट support आणि या ठिकाणी क्लिक करायचे आहे. आपल्याला सर्वात पहिल्यांदा राज्य निवडयचे आहे. महाराष्ट्र निवडल्यानंतर त्याच्यानंतर, दुसरा ऑप्शन आहे जिल्हा निवडवा,  तालुका निवड करायचा आहे. त्याच्यानंतर आपले गांव निवडा. आपल्या गावाची यादी दिसेल. गाव सिलेक्ट केल्यानंतर त्याखाली आपल्याला एक ऑप्शन दिसेल शो show नावाचे, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. शो बटणावर क्लिक केल्यानंतर त्या गावचे पूर्ण डॅशबोर्ड उघडेल. डॅशबोर्डवर त्या गावातील रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांची संख्या दिसेल, त्यांना किती पेमेंट मिळालेला आहे,

Read  Jilha Parishad Bharti Timetable Maharashtra 2023 | जिल्हा परीषद भरती वेळापत्रक महाराष्ट्र 2023

शेतकऱ्यांच्या आधारचा डाटा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन डाटा, त्याचबरोबर रिसिव्हड ऑल पेमेंट, त्यानंतर आधार स्टेटस दिसेल, रिजेक्टेड किती जणांचे झालेले आहे. याच खाली ऑनलाईन रजिस्ट्रेशनची यादी दाखवली आहे. ज्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेल्यांची संख्या रिजेक्टेड झालेल्यांची संख्या आणि एक्सेप्ट झालेल्यांची संख्या तसेच पेंडिंग असलेल्यांची संख्या.

आपल्याला रेजेक्टेड या बटनावर ती क्लिक करायचे आहे. रिजेक्टेड बटणावर क्लिक केल्यानंतर त्या खाली आपल्याला चार्ट दाखवला जातो. याच खाली त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांची यादी येथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा एक्सेप्ट झालेल्या शेतकऱ्यांची नावे दाखवले आहेत. त्याच्याखाली रेजेक्टेड ची यादी दिसेल. या यादीमध्ये रिजेक्टेड झालेल्या शेतकऱ्यांची नावे दिसतील. अशाप्रकारे अपात्र झालेल्या शेतकऱ्यांची नावे आपल्याला तिथे पहायला मिळतील आणि यावरून आपण अपात्र आहोत हे दिसेल.

Read  PM Kisan 11th Installment Date in Marathi | पी एम किसान योजना 11वा हप्ता तारीख

या अपात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्याची नावे, एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे, निवृत्तीवेतनधारक, नोकरदार, कर देणारे, एक विशेष बाब या यादीमध्ये दिसते ती म्हणजे जे विद्यार्थी महाडीबीटी पोर्टल वर स्कॉलरशिपचा लाभ घेतात अशा विद्यार्थ्यांची नावे सुद्धा या लाभार्थी यादी मध्ये आलेली आहेत. अशाप्रकारे विविध कारणांमुळे अपात्र शेतकऱ्यांच्या यादी मध्ये बऱ्याच जणांची नाव आलेले आहेत.

अशाप्रकारे आपण पात्र अपात्र यादी पाहू शकता. बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की, माझे नाव अपात्र यादी मध्ये नसून सुद्धा माझ्या खात्यावर  दोन हजार रुपये पी एम किसान pm Kisan चा हप्ता आलेला नाही. मग अशावेळी मित्रांनो pmkisan.gov.in च्या होम पेज ला जायचं आहे होमपेज च्या खाली आल्यानंतर, हेल्प डेस्क help desk या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. येथे गेल्यानंतर आपल्या आधार कार्ड टाकून तक्रार द्यायची आहे. त्यामध्ये आपला कोणता हप्ता आला नाही त्याबद्दल सविस्तर अशी माहिती लिहायची आहे त्यानंतर आपली तक्रार तिथे बुक होईल जेणेकरून आपल्याला आपला हप्ता येण्यासाठी मदत होईल.

Read  PM Kisan Yojana 11th Installment | पी एम किसान योजना 11वा हप्ता

अशाप्रकारे मित्रांनो जर आपले नाव pm kisan samman nidhi yojana अपात्र यादी मध्ये नाव आले नसेल तर कशा प्रकारे आपण तक्रार नोंदवायची आहे. यासाठी आपल्याला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट करुन सांगा आणि हो आपल्याला आरोग्याबद्दल  माहिती हवी असेल तर आमच्या मराठी आरोग्य marathi aarogyaयोगा टिप्स yogatips या ब्लॉगला अवश्य भेट द्या

Leave a Comment