PM Kisan Yojana 11th Installment | पी एम किसान योजना 11वा हप्ता

PM Kisan Yojana 11th Installment शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार, जाणून घेण्यासाठी पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) केंद्र सरकारकडून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. नवीन वर्षात, पीएम किसान योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारने 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. काही शेतकऱ्यांना मात्र जे केंद्र सरकार कडून सुरू असलेली सुविधा आहे. याचा लाभ त्यांना होऊ शकला नाही. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुमच्या माहितीसाठी सरकार लवकरच 11 व्या हप्त्यासाठी पैसे पाठवणार आहे. 11 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही वेळ न घालवता ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. या महिन्यात जमा होतो. प्रत्येक आर्थिक वर्षात, पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो. हे हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो.

Read  PM Kisan Status 2022 11th Kist Beneficiary Status, Date in Marathi

या योजनेसाठी नोंदणी करणे हे सोपे आहे. या योजनेची प्रक्रिया ही ऑनलाईन असते. म्हणून ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा पटवारी किंवा स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. तसेच, तुम्ही या योजनेसाठी स्वतः देखील नोंदणी करू शकता.

ऑनलाइन नोंदणी कशी करायची तर तुम्हाला पहिल्यांदा पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
त्यानंतर आता Farmers Corner वर जा.
येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर या प्रोसेसला पुढे करावे लागेल.
या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.

Read  Jilha Parishad Bharti 2022 | जिल्हा परिषद भरती 2022 .

योजनेचे लाभार्थी असाल तर असे करा तुमचे नाव तपासून पहा :
पीएम किसान योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे.
यासाठी प्रथम www.pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर, फार्मर्स कॉर्नर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे. आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादी (Beneficiary list) वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकता.

बऱ्याचदा सरकारकडून खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात, पण ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. याचे मुख्य कारण तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांकात काही तरी चूक असण्याची शक्यता असते. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकत नाही. त्यामुळे आपला आधार क्रमांक बँक क्रमांक व तपासून पाहणे गरजेचे आहे.

Read  Job Card Scheme Maharashtra | जॉब कार्ड योजना महाराष्ट्र २०२३

ही माहिती कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment