मित्रांनो जर आपल्याला पी एम किसान PM Kisan Samman Yojana Benefishary Status योजनेचे दोन हजार रुपये मिळाले नसतील तर आपण काय करायला पाहिजे? हेच या लेखामध्ये आपण बघणार आहोत. जेव्हा शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले तेव्हा केंद्र सरकारने पी एम किसान सन्मान निधी चा सातवा हप्ता जमा2 व्ह्यायला सुरुवात झाली आणि हा हप्ता 1 डिसेंबर पासून 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात देखील झाली.
दरवर्षी या योजनेअंतर्गत सहा हजार रुपयांची आर्थिक मदत सरकार देते. या रकमे मधून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये बियाणे व खते खरेदी करण्यास सोपे जाते. जर आपण पी एम किसान योजनेच्या निधी करता अर्ज केला असेल आणि ही रक्कम तुम्हाला जर अद्याप मिळाली नसेल तर, तुम्ही काय करणार हे त्या लेखामध्ये आपण बघूया.
पहिल्यांदा आपण तपासा आपले नाव
त्याकरता आपल्याला pakistan.gov.in या वेबसाईटला गुगलवर सर्च करावे लागेल त्यानंतर गुगलवर ही साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूस फार्मर्स कॉर्नर (farmers corner)अशी दिसेल
तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर बेनिफिशियरी स्टेटस वर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर तिथे टाकावा लागेल
हे सर्व केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव पी एम किसान योजनेचा निधी मध्ये आहे किंवा नाही हे समजेल. आपले नाव जर तिथे नोंदणी केलेले असेल, तर आपले नाव आपल्याला तिथे मिळेल याशिवाय जर आपल्या यादीमध्ये नाव नाही आहे तर, आपण ॲप द्वारे आपली स्थिती देखील तपासू शकता.
त्याकरता आपल्याला पंतप्रधान किसान मोबाईल ॲप डाऊनलोड करावे लागेल आणि पीएम किसान च्या द्वारे तुम्हाला तिथे तुमचे नाव शोधणे खूप सोपे जाईल. त्याकरता आपण खालील स्टेप फॉलो करा.
पहिली स्टेप PM Kisan Samman Yojana Benefishary Status
आपल्याला मोबाईल वरील प्ले स्टोअर मध्ये जायचे आहे आणि आपल्याला पी एम किसान योजनेचे ॲप डाऊनलोड करायचे आहे
दुसरी स्टेप
आपल्याला पी एम किसान योजनेच्या लिस्ट मध्ये जर आपले नाव दिसत नसेल तर, आपण काय करायला पाहिजे? याची काळजी करण्याची गरज नाही. कारण आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे किंवा आपल्याकडून चुका झाल्या असतील त्यामुळे आपला हप्ता थांबला असेल तर, अशा परिस्थितीमध्ये आपण पोर्टल वर जाऊन आपल्या चुका दुरुस्त करा त्यानंतर आपल्या खात्यामध्ये निश्चितच हप्ता जमा होईल.
आपले नाव जर यादीमध्ये नाही तर आपण खाली दिलेल्या क्रमांकावर तक्रार सुद्धा करू शकता. यापूर्वी सुद्धा बऱ्याच लोकांच्या नावे रक्कम जमा झाली नाही. परंतु जर आपण खालील नंबर वर संपर्क करून आपली तक्रार नोंदविली किंवा हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधला तर, आपल्याला आपल्या हप्ता मिळू शकतो.
त्याकरिता आपण 011-24300606 या क्रमांकावर आपल्याला संपर्क साधायचा आहे. मागील वेळी एक कोटीहून अधिक लोकांना याचा लाभ मिळू शकला नाही आपण हेल्पलाइन नंबर वर माहिती देखील मिळू शकता, याकरता
पंतप्रधान किसान हेल्पलाइन क्रमांक आहे:-155261
पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक:-18001155266
पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक:-011-23381092,23382401
पंतप्रधान किसान आणखी एक हेल्पलाइन नंबर:-0120-6025109
PM Kisan Samman Yojana Benefishary Status