PM Kisan Yojana Remain Installment | न मिळालेला पी एम किसान योजनेचा 2000 हप्ता मिळणार

PM Kisan Yojana Remain Installment आपले बँक पासबुक व आधार कार्ड तयार ठेवा. 2000 रुपये अनुदानासाठी गावो-गावी कॅम्प येणार…..! काय आहे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्य याविषयी माहिती जाणून घ्या.

महाराष्ट्र शासन परिपत्रक :

महाराष्ट्र शासनाच्या कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातर्फे दिनांक 22 फेब्रुवारी 2022 रोजीचा शासन निर्णय शासन परिपत्रक आहे. मित्रांनो या शासन परिपत्रक यामधील तो महत्वाचा मुद्दा आहे. त्याविषयी महत्वाची माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत प्रलंबित अर्जाच्या डाटा दुरुस्तीचे काम करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना एनआयसी (NIC)मार्फत दूरध्वनीद्वारे मेसेज पाठवून त्यांचा अर्ज कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे. याबाबत कळविण्यात यावे म्हणजे ज्या शेतकरी पात्र असून सुद्धा आतापर्यंत 2000/- रुपये मानधन याचा लाभ त्यांना मिळाला नाही. त्यांना आता एनआयसी मार्फत मेसेज संदेश येणार आहेत. त्यांच्या मोबाईलवर आणि त्यांचा अर्ज प्रलंबित आहे आणि त्यांना हे अनुदान का मिळत नाही. याची सर्व जी कारण आहे ती मेसेजद्वारे शेतकऱ्यांना सांगण्यात येणार आहे.

Read  MSRTC Free Bus Service In Maharashtra 2023 | मोफत बस सेवा महाराष्ट्र २०२३ .

मित्रांनो, त्यांचा अर्ज कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे. याबाबत कळविल्यानंतर सदर डाटा दुरुस्तीचे काम पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी मार्च महिन्यातील येणाऱ्या चौथ्या शुक्रवारी गावाच्या तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत कॅम्पचे आयोजन सर्व पात्र लाभार्थ्यांच्या डाटा दुरुस्ती होईपर्यंत करण्यात यावे.

म्हणजेच मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहे. ज्यांना लाभ मिळत नाही, त्यांना मेसेज पाठवण्यात येणार आहेत आणि ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या साह्याने कॅम्पमध्ये आता सर्व डाटा दुरुस्त करण्यात येणार आहे आणि या कॅम्प अर्जदारांना सोबत यांचा सातबारा, उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन येण्याबाबत कळविण्यात यावे आणि त्याच्या डाटा दुरुस्तीचे काम महसूल कृषी व ग्रामीण विकास विभागाच्या समन्वयाने जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.

Read  Adhaar Ration Link | आधार कार्ड राशन कार्डला लिंक कसे करायचे?

जे शेतकरी 2000 रुपये अनुदानापासून वंचित राहिले आहेत. ते पात्र होते परंतु काही कागदपत्रांच्या त्रुटींमुळे ते वंचित झाले परंतु आता ही दुरुस्ती करण्यात येणार आहे. म्हणून अपात्र शेतकरी बांधवांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

मित्रांनो, मार्च महिन्यातील चौथ्या शुक्रवारी गावामध्ये सहभाग घेऊन आपण सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी सादर करून या योजनेचा लाभ नक्कीच घेऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे इतर कारणामुळे अपात्र ठरलेली लाभार्थ्यांची सुद्धा वसुली होणार आहे आणि हे सर्व निधी त्यांच्याकडून परत घेऊन केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहेत. अतिशय महत्त्वाची बातमी आणि महत्त्वाचा हा शासन परिपत्रक आहे.

PM Kisan Yojana Remain Installment तर ही माहिती सर्व शेतकरी बंधूंना आणि गावातील ग्रामपंचायती पर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा व ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Read  Free Rashan Yojana 2023 | मुफ्त राशन योजना २०२3 .

हे पण नक्की वाचा :- बायोग्रफीलोन मराठी

Leave a Comment