PM Kisan Yojana पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांकरीता आनंदाची बातमी आहे. 2020 च्या डिसेंबरमध्ये पी एम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला. कोरोना व निवडणूक यामुळे आठवा हप्ता येण्यास उशीर झाला. पण आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपणार आहे.
पी एम किसान योजना PM Kisan Yojana
कृषी मंत्रालयाने देलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी शुक्रवारी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान किसान योजनेंतर्गत पुढचा हफ्ता जाहीर करतील. मंगळवारी सकाळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकर्यांना यासंदर्भात एक मॅसेजही प्राप्त झाला आहे. मॅसेजमध्ये असे लिहिले आहे की, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 14 मे 2021 रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करतील आणि पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता जाहीर करतील. या कार्यक्रममध्ये आपण pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून संपर्क साधू शकता. तुम्हाला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मनापासून निमंत्रण आहे.
केव्हापासून लागू आहे पी एम किसान योजना
1 डिसेंबर 2018 पासून लागू आहे ही योजना. लोकसभा निवडणुका 2019 पूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. तथापि, 1 डिसेंबर 2018 पासून प्रभावी मानले गेले. सुरवातीला 3 कोटी 16 लाख 05 हजार 539 शेतकर्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळाला. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 कोटीहून अधिक शेतकर्यांची नोंदणी झाली आहे. डिसेंबरमध्ये जाहीर केलेला हप्ता 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱ्यांना देण्यात आला. आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्यात जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. यावेळी केंद्र सरकारने एकूण 10 कोटी 48 लाख 95 हजार 545 शेतकर्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठविले होते.
पी एम किसान योजनेचे(pm kisan yojana) किती रुपये मिळतात?
2-2 हजारांच्या तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये मिळतात. पंतप्रधान किसान योजनेचा सातवा हप्ता 25 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले होते. त्यानंतर आतापर्यंत 10 कोटी 71 हजार 7 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यात आले आहेत. डिसेंबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत 8 कोटी 95 लाख 15 हजार 225 शेतकर्यांना पैसे मिळाले. त्याअंतर्गत, 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मिळतात. जेणेकरून ते याचा उपयोग कृषी कामात करु शकतील.
आपण pmkisan.gov.in या वेबसाईट ला भेट देऊन अधिकाची माहिती घेऊ शकता.