group

Shetsara Maharashtra 2022 | शेतसारा महाराष्ट्र शासन

Shetsara Maharashtra 2022 आता ‘महाराष्ट्र शासनाचे’ नाव, सातबार्‍यावर…. काय आहे नेमके प्रकरण? शेतकऱ्यांनो सावध व्हा…! वेळेत सातबारा भरा.

महाराष्ट्र शासनाचे नाव सातबाऱ्यावर कसे काय पडेल याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.

शेतकऱ्यांविषयी नेहमीच सरकारचे निर्णय सुरूच असतात. परंतु शेतसारा अदा करण्याकडे कायम शेतकऱ्यांचे दुर्लक्ष राहिलेले आहे. कृषीपंपाच्या थकबाकीप्रमाणेच महसूल विभागाच्या शेतसाऱ्याची अवस्था आहे. वाढत्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहिमच महावितरणने हाती घेतली आहे तर आता दुसरीकडे शेतसारा अदा करण्याचे ओझे हे शेतकऱ्यांवर राहणार आहे.

आर्थिक वर्ष पूर्ण होण्याअगोदर शेतकऱ्यांना हा शेतसारा रक्कम अदा करावी लागणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर थेट (State Government) महाराष्ट्र शासनाचे नाव लागू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत शेतसारा रक्कम अदा करण्याचे आवाहन निफाडच्या तहसीलदांरांनी केले आहे.

Read  Land Information in Marathi शेतीला रस्ता मिळण्याकरता असा करा अर्ज

मार्च महिन्याअखेरपर्यंत वसुली व्हावी या उद्देशाने महसूल विभागाचे कर्मचारी गावोगावी फिरत आहेत मात्र, शेतकरी वर्गाकडून शेतसारा भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

शासनाचा नियम काय सांगतो?

वेळेत शेतसारा अदा व्हावा म्हणून सध्या वसुली मोहिम ही सुरु आहे. त्याअनुंशांने शेतकऱ्यांनी वेळेत रक्कम अदा केली नाही तर त्यांना नोटीस बजावली जाते. यानंतरही कर अदा केला नाही तर सक्तीच्या वसुलीच्या कारवाईला सुरवात केली जाते. या कारवाईला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 176 ते 182 अन्वये कायदेशीर असा आधार आहे.

पहिल्या नोटीसनंतर दुसरी नोटीस ही जंगम मालमत्ता आणि त्यानंतर स्थावर मालमत्ता. एवढे करुनही जर खातेदाराने कर अदा केला नाही तर मात्र, स्थावर मालमत्ता जप्त होते म्हणजेच खातेदाराच्या उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचे नाव लागते. यानंतरही शेतकऱ्यांनी कर अदा केला नाही तर मात्र सदर मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जात असल्याचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगितले आहे.

Read  Ativrushti Madat 2021 | हे 22 जिल्हे अतिवृष्टी मदतीसाठी आहेत पात्र

निफाड तालुक्यात झाली कारवाईला सुरवात

शेतकऱ्यांनी शेतसारा अदा करावा म्हणून निफाड तालुक्यात वसुलीला सुरवात झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. मार्च अखेरपर्यंत शेतसारा हा अदा करुन घेण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा कर वेळेत भरणे गरजेचे आहे. अन्यथा सक्तीच्या वसुलीला सुरवात केली जाणार आहे. सध्या महसूलचे कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या दारोदारी जाऊन वसुली करीत आहेत.

थकबाकीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष

बिगरशेती खातेदाराकडे शेतसारा, बिनशेती सारा तसेच अनधिकृत बिनशेती दंड, लॉन्स, मोबाईल टावर, पंप यांच्याकडे महसुलाची रक्कम थकली असल्याने या थकबाकीदारांना वेळोवेळी नोटीस पाठवून देखील खातेदार याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या महसूलकडून नोटीसा तर बजावण्यात आल्या आहेत. भविष्यात शेतकरी शेतसारा भरणार की कारवाईला सामोरे जाणार हे पहावे लागणार आहे.

Read  PM Kisan Yojana e-kyc | पी एम किसान योजना ई-केवायसी

Shetsara Maharashtra 2022 ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

Categories GR
group

Leave a Comment

x