Talathi Karyalay | तलाठ्यांना राहावे लागणार कार्यालय परिसरात अन्यथा होईल कारवाई

Talathi Karyalay – तलाठ्यांना राहावे लागणार कार्यालय परिसरात अन्यथा होईल कारवाई! आपल्या गावच्या तलाठ्यांना आता त्यांना देण्यात येणाऱ्या सज्जा मध्ये राहावे लागणार आहे. याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण बातमी आहे.

मित्रांनो, आपण पाहिलं तर राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालु आहे. या अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आलेले आहे. यात अशा एका महत्त्वाच्या लक्षवेधी मध्ये महत्वाचे एक प्रश्न होता. ते म्हणजे तलाठी कार्यालय मधील तलाठ्याची उपस्थिती. महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या नागरिकांसाठी असलेल्या सर्वच्या सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहे.

जसे की, त्याच्यामध्ये आपण पाहिले पीकपेरा, पीक पाहणी आता ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेले आहे. सातबारा ऑनलाइन पद्धतीने निघतोय.
त्याचबरोबर फेरफार ऑनलाइन पद्धतीने झाले किंवा इतर जुणे अभिलेख असेल तसेच इतर काही कागदपत्र असतील हे सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना आपल्या सरकारच्या माध्यमातून इतर सुविधांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने काढता येतात परंतु शेतकर्‍यांना इंटरनेटची उपलब्धता त्याच्याबद्दल नसलेला अवेरनेस किंवा तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून दिलेली कागदपत्रे हिच ओरिजनल असतात.

Read  1 कोटी 50 लाख सातबारा उतारे झाले संगणकीकृत, बघा नवीन सातबारा कसा दिसेल

अशा प्रकारचा एक समज या सर्वांचे पार्श्वभूमीवरती ग्रामीण पातळीवर आपण जर पाहिले तर तलाठी कार्यालयाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे आणि हे तलाठी कार्यालयामध्ये तलाठ्याची उपस्थिती असणे सुद्धा शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेले भाग आहे. परंतु मित्रांनो आपण जर पाहिले तर कार्यालयात तलाठ्यांची उपस्थिती नसणं अशा प्रकारच्या समस्या अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार शेतकऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना या ठिकाणी दिल्या जातात.

मित्रांनो, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती सध्या राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये आजच्या झालेल्या कामकाजामध्ये विधानसभा सदस्य श्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून तलाठी कार्यालय मध्ये तलाठ्याची उपस्थिती हा एक प्रश्न या ठिकाणी तारांकित करून मांडण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरादाखल राज्याचे महसूल मंत्री तलाठी हा ग्रामीण पातळीवरील अतिशय महत्त्वाचा घटक आहे.

Read  तुमच्या जमिनीची सरकारी किंमत जाणून घ्या Government Land Prices

राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून सर्व कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत असली तरी शेतकऱ्यांची कामे वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी तलाठी अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. याच्यासाठी सर्व तलाठ्यांना आपल्या तलाठी कार्यालयाच्या परिसरामध्ये देण्यात आलेल्या सज्जा मध्येच रहावे, अशा प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली.
जे तलाठी यापुढे आपल्या तलाठी कार्यालयाच्या परिसरामधील सज्जामध्ये राहणार नाहीत, त्यांचं घरभाडे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

जे तलाठी कार्यालय परिसरामध्ये राहणार नाही त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पगारामधून घरभाडे बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यकाळातील तलाठी कार्यालयमध्ये तलाठ्यांची उपस्थिती, शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्‍न मार्गी लागणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं. अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू.

Read  Satbara Utara | 100 रुपयांमध्ये जमिनीच वाटणीपत्र

तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे पण नक्की वाचा:  बायोग्राफी , लोन मराठी , बातमी मराठी

Leave a Reply

Your email address will not be published.

x