Vilasrao Deshmukh Abhay Yojana Mahavitaran | महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना

Vilasrao Deshmukh Abhay Yojana Mahavitaran महावितरणची नवीन योजना.
कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना.  जाणून घ्या काय आहे ही नवीन योजना.

कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणच्या माध्यमातून एका नव्या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. विलासराव देशमुख अभय योजना असे त्या योजनेचे नाव आहे. नेमकी ही योजना कशा प्रकारे राबविली जाणार आहे, या योजनेअंतर्गत कोणाला लाभ दिले जाणार आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या पोस्टमध्ये करणार आहोत.

मित्रांनो, महावितरणची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे आणि ग्राहकांच्या माध्यमातून वीज बिलाचे पैसे दिले तरच महावितरणला सध्याचा कोळसा टंचाईमधून मार्ग काढता येईल अन्यथा राज्य अंधारात जाऊ शकेल. अशा प्रकारची प्रतिक्रिया राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी 9 हजार कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकंडील थकबाकी वसुलीसाठी ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे राज्यातील 32 लाख ग्राहकांना पुन्हा वीज जोडणी मिळवण्याची संधी प्राप्त होणार आहे.

Read  PM Kisan Samman Nidhi 9th Installation पी एम किसान सन्मान निधि 9 वा हप्ता

महावितरणचे तीन कोटींहून अधिक वीज ग्राहक आहेत. वारंवार मागणी करूनही थकबाकीचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करावा लागतो. त्यांना ‘पीडी कनेक्शन’ म्हणून ओळखले जाते. डिसेंबर 2021 अखेर थकबाकी पोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद केलेल्या ग्राहकांची संख्या जवळपास 32 लाख 16 हजार 500 आहे. या ग्राहकांकडे थकबाकीची रक्कम 9 हजार 354 कोटी आहे. यामध्ये मूळ रक्कम 7 हजार 716 कोटी रुपये एवढी आहे.

फ्रेंचायझी असलेल्या भागाचं कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडून थकबाकीची रक्कम 9354 कोटी रुपये एवढी आहे. यामध्ये वीज थकबाकी चे मूळ रक्कम 6261 कोटी रुपये एवढी आहे. अशा या थकित रकमेची वसुली करणे हे खूप कठीण काम झाले असून अशा थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. जानेवारी महिन्यात थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांकडे येईल. थकबाकी काही प्रमाणात वसूल होईल व महावितरणची आर्थिक परिस्थिती सुद्धा सावरण्यासाठी हातभार लागेल या हेतूने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने अभय योजना राबवावी असे निर्देश दिले होते.

Read  10 वी निकाल 2022 | Maharashtra10th SSC Board Result 2022

कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद केलेल्या ग्राहकांना थकबाकी रकमेमध्ये काही सवलती देऊन त्यांचा घरगुती उद्योग, वाणिज्यिक व औद्योगिक वीजपुरवठा सुरू करता येईल व या योजनेच्या अंमलबजावणीमुळे बंद झालेले व्यवसाय उद्योग पुन्हा सुरू होतील व लाखो लोकांना रोजगार मिळेल व राज्याच्या अर्थकारणाला गती मिळेल असा हेतू या योजनेचा चालू करण्यामागे आहे. असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद केलेल्या ग्राहकांसाठी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांच्या नावाने योजना राबवली जाणार आहे, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.

थकबाकीदार ग्राहकांनी मुद्दलची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना 5% व लघुदाब ग्राहकांना 10% अधिकची सवलत थकित मुद्दल रकमेत मिळेल. हप्तय़ात भरण्याची सुविधा देखील देण्यात येणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात ग्राहकांनी महावितरणला दाव्याचा खर्च देणे बंधनकारक राहील. ज्या ग्राहकांचा न्यायालयात वाद चालू असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही योजना फ्रेंचायझीमधील ग्राहकांना सुद्धा लागू असेल, असेही ते म्हणाले.

Read  PM Kisan 12th Installment Benefishary Status | पी एम किसान योजना 12वा हप्ता

योजनेची वैशिष्ट्ये :

योजनेचा कालावधी 1 मार्च 2022 ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत राहील. ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू असेल. थकबाकीदार ग्राहकांनी मूळ रक्कम एकरकमी भरल्यास व्याज व विलंब आकार 100% माफ होईल.

Vilasrao Deshmukh Abhay Yojana Mahavitaran ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
error: Content is protected !!