अतिवृष्टी नुकसानभरपाईचे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी म्हणजे सोमवारपासून पैसे जमा होणार आहेत. या विषयी आपण सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घेऊया.

राज्यातील अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भरपाई म्हणून शासनाने 10 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केली होती.

दिवाळीआधी सरकार कडून शेतकऱ्यांना मदत देण्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे. 10 हजार कोटी रुपये मदतीच्या पॅकेजची घोषणा करताना दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल,असा आम्ही प्रयत्न करू.

तर आज ती खुशखबर मिळालीच आहे 5 नोव्हेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे. शेतकरी मित्रांनो मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे की, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते.

Read  उद्धव ठाकरे यांची मोदींकडे मागणी Atiwrushti Madat 3721 Crore

कारण निवडणुका तोंडावर आहेत. सणासुदीला शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी राहणार नाही, असं वचन सरकारने दिलं होतं. कारण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे आणि अशा परिस्थितीत जर आचारसंहिता लागली तर शेतकऱ्यांना मदत देता येणार नाही, म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आता सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात होणार आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यांमध्ये जमा होणार आहे पहिला हप्ता 4 हजार 700 कोटी रुपयांचा असणार आहे.

नागपूर विभाग वगळण्याची शक्यता

नागपूर विभाग करता यापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये 162 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता आणि इतरांच्या नुकसानभरपाई करिता आता निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

त्यातील अर्धी रक्कम सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि उर्वरित जी रक्कम आहे. ती नंतर जीआर निघाल्यानंतर जमा करण्यात येईल 29 सप्टेंबर 2020 रोजी नागपुर विभागाकरिता करता निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

Read  पीक विम्याचे पैसे मिळणार शेतकऱ्यांची निराशा दूर. 85 कोटी पीक विमा मंजूर

अशा प्रकारचा जीआर निघाला होता. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांकरिता करता हा निधी 30, 31 ऑगस्ट 2020 व 1 सप्टेंबर 2020 रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी वितरित करण्यात येत आहे. अशा प्रकारचा जीआर निघालेला होता.

अशाच प्रकारचा जीआर अमरावती विभागा करता सुद्धा निघालेला होता. म्हणजेच नागपूर विभागातील सहा जिल्हे आणि अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत हा निधी मंजूर झालेला आहे. आता मात्र विदर्भात जिल्ह्यांचा समावेश यामध्ये असेल की नाही, हे सांगता येत नाही.

कारण मदत निधी करता नवीन जीआर निघणार आहे आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारची शक्यता आहे, हे सांगता येत नाही. ह्या बाबत आम्ही तुम्हाला अपडेट देणारच आहोत.

आपण हे वाचले कां?

महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात पैसे येणार

Read  Ativrushti Nuksan Bharpai 2023 | अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023

CCI च्या कापूस खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी कशी कराल?, app वर पहा आजचे बाजार भाव अगदी सहज

आता बँक कर्जाकरिता सातबारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही !

आता रब्बी हंगामाकरिता 4 लाख 14 हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप होणार – दादासाहेब भुसे, कृषी मंत्री

 

बांधकाम परवानगी बाबत ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय

 

Leave a Comment