शेतातील झोपडीत दडवले चाकू सुरी, कोयते, गुप्ती! पोलिसांनी केली कारवाई

अमरावती : अचलपुरातील सरमसपुरायेथील एका शेतातील झोपडीत दडवून ठेवलेला शस्त्रसाठा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. ८ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत चाकू, भाला, दोन कोयते व एक गुप्ती ही शस्त्रे हस्तगत करण्यात आली. तेथून सुबान खाँ मोहम्मद खाँ (रा. मेहराबपुरा, अचलपूर) याला अटक करण्यात आली. अचलपुरातील नवबाग शेतशिवारातील शेतामध्ये असणाऱ्या झोपडीत एकाने अवैधरित्या विनापरवाना … Read more

काठीने वार करून संपविले: मग म्हणाला विष पिऊन मेली महिला; दारूच्या वाद; आरोपीला अटक

परतवाडा : दारू पिण्याच्या वादातून एक महिला व पुरुषामध्ये झालेल्या वादातून शनिवारी रात्री हातपाय, डोक्यावर काठीने वार करून महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना नजीकच्या गौरखेडा कुंभी शिवारातील शेतात रविवारी सकाळी उघडकीस आली. आरोपीने थेट पोलिस पाटलाचे घर गाठले आणि ती महिला विष प्राशन करून मरण पावल्याचा बनाव केला. परंतु, घटनास्थळी दाखल झालेल्या परतवाडा पोलिसांनी मृतदेहाची … Read more

नवरा-बायकोत वाद, बापानेच केले लेकीचे अपहरण

अमरावती : पाळणाघरातून तीन वर्षीय चिमुकलीचे तिच्याच वडिलांनी अपहरण केल्याची तक्रार संचालक महिलेने फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली. २५ जानेवारी रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी, पोलिसांनी २६ जानेवारी रोजी उशिरा रात्री अपहृत मुलीच्या वडिलांसह अन्य एकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. फिर्यादी महिला या आठ वर्षांपासून फ्रेजरपुरा हद्दीत पाळणाघर चालवितात. … Read more

तरुणीला गरोदर करून म्हणाला ‘तो मी नव्हेच’! अतिप्रसंग, गर्भपात : दुसरीशीच संधान

अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार अतिप्रसंग करण्यात आला. त्यातून ती गर्भवती झाली. त्यानंतरही त्याने ‘तो मी नव्हेच’ चा पवित्रा कायम ठेवला. गर्भधारणेनंतर त्याने मी लग्न करणार नाही म्हणजे नाहीच, असे तिला बजावले. लग्नास थेट नकार देऊन त्याने दुसऱ्याच मुलीशी लग्न जोडले. त्यामुळे ती आजारी पडून तिचा गर्भपात झाला. २० जानेवारी पूर्वी ही … Read more

म्हणे माझ्याशी लग्न कर, अन्यथा आत्महत्या करेन; चाकू दाखवून दिली धमकी, गुन्हा दाखल

अमरावती : माझ्याशी लग्न कर, अन्यथा मी आत्महत्या करेन, अशी धमकी देत तरुणाने आपला पाठलाग चालविल्याची तक्रार एका तरुणीने खोलापुरी गेट ठाण्यात नोंदविली आहे. याप्रकरणी २० जानेवारी रोजी जीवन विशाल वानखडे (२३, रा. गांधी आश्रम) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी जीवन वानखडे तरुणीच्या ओळखीचा आहे. काही दिवसांपासून आपल्या मागे येऊन तो लग्नाची मागणी करतो, … Read more