शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय वैज्ञानिकांनी गव्हाचे खूप जास्त पीक घेता येईल असे वाण शोधून काढले आहे, ज्याचे नाव आहे अस्टिव्हियन MACS 6478 आपण बियाणाची जर पेरणी केली तर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट म्हणजेच 45-60 क्वीटल होणार आहे.
आता गव्हाचे उत्पन्न होईल दुप्पट MACS 6478 गहू वाण विकसित
Table of Contents
अशाप्रकारे संशोधकांचा दावा सुद्धा आहे तर त्याच नवीन बियाणे विषयी आपण सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घेऊया.
सरकार करतेय पाठपुरावा MACS 6478 गहू वाण
पत्र सूचना कार्यालयाचे भारत सरकार यांच्याकडून एक पत्र निर्गमित केल गेल आहे या पत्रामध्ये या पत्रामध्ये सविस्तर काय आहे ते बघुया गव्हाच्या नव्या वाणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे.
नव्याने विकसित झालेला सामान्य किंवा पोळीचा गहू म्हणजेच अस्टिव्हियन जातीच्या या गव्हाचे पीक केवळ 110 दिवसात तयार होते तसेच अनेक प्रकारच्या किडींपासून प्रतिरोधक क्षमता ही या वाहनाची वैशिष्ट्य आहे भारतीय वैज्ञानिकांनी गव्हाचे खूप जास्त फिक घेता येईल.
शेतकरी श्रीमंत का नाही? Farmer Information in Marathi
कोठे मिळाले एवढे उत्पादन MACS 6478
अशा प्रकारचे नवे वाण विकसित केले आहे शेतकऱ्यांच्या या वाहनाचा उपयोग होत असून शेतकऱ्यांना त्याच्या पिठाची पोळ्या किंवा चपात्या उच्च दर्जाच्या आहेत आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी गव्हाचे MACS 6478 हे वाण विकसीत केले आहे आणि या वाणाच्या लागवाडीनंतर महाराष्ट्रातील करंजखोप या गावातील शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न सुद्धा मिळालेले आहे.
MACS 6478 गहू वाण किती उत्पादन मिळते
आणि शेतकरी मित्रांनो हे नवीन वाण विकसित करण्यात आलेले आहे ते पुण्याच्या आघारकर विज्ञान संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी शोधून काढून विकसित केलेले आहे आणि या नवीन वाहनाचे नाव आहे MACS 6478 आणि या नवीन वाहनाचा प्रयोग सुद्धा करंजखोप गावात यशस्वी झाला आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील या गावातील शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टर 45 ते 60 क्विंटल गव्हाचे उत्पन्न झालेले आहे.
याआधी त्यांना केवळ 25 ते 30 क्विंटल गव्हाची उत्पन्न व्हायचे परंतु आता नवीन वाण विकसित झाल्यामुळे आणि त्याचा प्रयोग यशस्वी ठरल्यामुळे त्यांना 45 ते 60 क्विंटल प्रति हेक्टरी गव्हाचे उत्पन्न येत आहे. याआधी हे शेतकरी लोक वन HD 2189 आणि इतर जुनी बियाणे लावत असत. परंतु आता या नवीन वाहनामुळे त्यांना गव्हाचे उत्पन्न वाढण्यासाठी मदतच झालेली आहे या नवीन वाणाला सामान्य गहू किंवा पोळी चपातीचा गहू म्हटले जाते.
Talathi तलाठी दप्तर होणार ऑनलाईन
किती दिवसात मिळते एवढे उत्पादन?
त्यालाच वैज्ञानिक भाषेमध्ये अस्टिव्हियन म्हटले जाते. हा गहू केवळ 110 दिवसांमध्ये तुम्हाला या 45 ते 60 क्विंटल घेता येऊ शकते तसेच गव्हाच्या पानांवर किंवा भांड्यांवर येणाऱ्या किडीला रोखण्याची क्षमता या गव्हाच्या वाणामध्ये आहे. अशा प्रकारचा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे, तसेच माजी बियाणे प्रमाणक अधिकारी आणि आघारकर संस्थेतील सहकार्यामुळे आता नवीन वाण विकसित झालेले आहे. आतापर्यंत एकूण दहा शेतकऱ्यांनी 14 एकर जमिनीवर या वाणाची लागवड करून भरपूर पीक घेतलेले आहे.
शेतकऱ्यांनी केली स्वतःची कंपनी सुरु
करंजखोप च्या शेतकऱ्यांनी स्वतःची एक कंपनी स्थापून आणखी बियाणे निर्मिती करण्याचा निश्चय केलेला आहे. या गावातील शेतकऱ्यांचे हेच म्हणणं आहे की, आम्हाला कुठेतरी चेतना, कुठेतरी प्रेरणा पाहिजे होती आणि ती प्रेरणा देण्याचं काम आघारकर संस्थेने केलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो की, त्यांनी आम्हाला एम ए सी एस 6478 हे वाण उपलब्ध करून दिले आहे.
महाराष्ट्रात गव्हाच्या पिकास चांगली संधी
आता आम्ही मागं वळून पाहणार नाही अशी माहिती शेतकरी रमेश जाधव यांनी दिली आहे. खरोखरच महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी गव्हाचे पीक घेतात, त्यांच्या करता MACS 6478 हे वाण वरदानच ठरणार आहे, शेतकरी मित्रांनो हे वाण विकसित झालेले आहे आणि याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा हे वाण कुठे मिळेल? कसे मिळेल? पुढच्या लेखांमध्ये किंवा पुढच्या पोस्टमध्ये सर्व सांगणार आहोत त्याकरता थोडी वाट बघावी लागेल.
MACS 6478 गहू वाण आपण हा लेख वाचला, आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद आमचे नवीन लेख वाचण्याकरता जी बेल दिसते आणि उजव्या साईडला तिला क्लिक करा म्हणजे आम्ही नवीन लेख टाकला आहे, याची सूचना तुम्हाला मोबाईलवर त्वरित कळेल.
आमच्या योगा टिप्स या ब्लॉगला पण भेट द्या