शेतकऱ्यांना मोफत सोयाबिन व भुईमूग बियाणांचे वाटप होणार Mofat Soyabean Bhuimug Watap

Mofat Soyabean Bhuimug Watap – मित्रांनो शेतकऱ्यां करता अत्यंत दिलासादायक आणि चांगली बातमी आहे कारण शेतकऱ्यांना आता सोयाबीन आणि भुईमूग याचे बियाणे हे मोफत मिळणार आहेत. मित्रांनो यापूर्वी आपण पाहिलं होतं की केंद्र शासनाच्या वतीने डाळी या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी तूर, मूग आणि उडदाचे बियाणे मोफत देण्याची घोषणा केली होती ज्यामध्ये 20 लाख 70 हजार शेतकऱ्यांना हे बियाणे मोफत दिले जाणार होते.

शेतकऱ्यांना मोफत सोयाबिन व भुईमूग बियाणांचे वाटप होणार

मित्रांनो याच बरोबर 2021 साठी खरीप हंगाम मध्ये शेतकरी आत्मनिर्भर होण्याकरता सोयाबीन आणि भुईमुगाचे बियाणे शेतकऱ्यांना मोफत देण्यासंदर्भात घोषणा केंद्र शासनाकडून केली आहे.

यासंबंधी कृषी मंत्रालयाने जारी केलेले प्रसिद्धीपत्रक आपण पाहू शकता त्यामध्ये 8 लाखाहून अधिक सोयाबीन मिनीकीट व 74 हजार शेंगदाणा मिनीकीट तयार केल्या जाणार आहेत. याअंतर्गत 6.37 लाख हेक्टर क्षेत्र हे तेल बी अंतर्गत लागवडीखाली आणल जाणार आहे.

Read  Kusum Solar Pamp Yojana Maharashtra 2023 | कुसुम सोलार पंप योजना २०२३ .

याकरता 30 एप्रिल 2021 रोजी खरीप परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत विशेष खरीप योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेच्या माध्यमातून सोयाबीन आणि भुईमुगासाठी क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी योजना आखण्यात आली होती.

यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व तेलबिया व तेलपाम अभियानांतर्गत उच्च उत्पादन देणारी वानं शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यासाठी भर देण्यात आला होता त्यामध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान तेलंगणा, कर्नाटक व छत्तीसगड या राज्यांकरता 41 जिल्ह्यात करता 1 लाख 47 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर 76.03 कोटी रुपये खर्च करून आंतरपीक म्हणून सोयाबीन बियाण्याचे वाटप केल जाणार आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तर प्रदेश, छत्तीसगड व गुजरात या राज्यातील 73 जिल्ह्यांमध्ये 390000 क्षेत्रात 104 कोटी खर्च करून सोयाबीन बियाण्याची वितरण करण्यात येईल.

Read  Annasaheb Patil Arthik Karjmukti Maharashtra 2023 |अण्णासाहेब पाटील आर्थिक कर्जमुक्ती महारष्ट्र २०२३ .

पिक विमा मंजुर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा Pik Vima

Mofat Soyabean Bhuimug Watap

राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, उत्तर प्रदेश व बिहार या नऊ राज्यातील 90 जिल्ह्यांमध्ये 40 कोटी खर्च करून मिनी किटचे वितरण करण्यात येईल.

याचे क्षेत्र 10 लाख 6 हजार 636 हेक्टर असेल आणि मिनी कीट ची संख्या 8 लाख 16 हजार 435 असेल.

वितरित केल्या जाणाऱ्या सोयाबीन बियाणांची उत्पादन क्षमता प्रति हेक्‍टरी 20 क्विंटलपेक्षा कमी नसेल.

तेलबिया व पाम तेल वरील राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारने खाद्य तेलाची आवश्यकता वाढवणे आणि तेलबिया व पाम तेलाचे उत्पादन व उत्पादकता वाढवून खाद्यतेलाची आयात कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे यासाठी बहुआयामी धोरण अवलंबिले जात आहे.

Read  ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 | Tractor subsidy scheme

अशाप्रकारे मित्रांनो पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आता Mofat Soyabean Bhuimug Watap मोफत भुईमूग आणि सोयाबीनचे बियाणे दिली जाणार आहेत.

हे पण वाचा : मराठी मोल 

Leave a Comment