PM Kusum Yojana सौर कृषी पंप योजना

सौर कृषी पंप योजना म्हणजेच PM Kusum Yojana. ही केंद्र सरकार राबवते, या मार्फत शेतकऱ्यांना सौर पंपाचा लाभ मिळणार आहे किंवा शेतकरी या योजनेचा लाभ कसा घेऊ शकणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना कोठे अर्ज करावा लागणार आहे. याची सविस्तर माहिती या लेखामध्ये बघूया.

PM Kusum Yojana सौर कृषी पंप योजना

केंद्र सरकारने देशांमधील शेतकऱ्यांसाठी सौर पंप व ग्रीड कनेक्टेड सौर आणि इतर नवीन करणीय उर्जा सयंत्र स्थापित करण्यासाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा व उत्थान महाअभियान म्हणजेच पीएम कुसुम योजना सुरू केलेली आहे.

या पीएम कुसुम योजनेमध्ये 5 एचपी 3 एचपी आणि 7.5 एचपी क्षमतेचे सौर पंप स्थापित करण्यात येणार आहेत. या योजनेमार्फत महाराष्ट्रामध्ये जवळपास एक लाख सौर पंप स्थापित करण्यात केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. तर पीएम कुसुम योजनेचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर नेमका अर्ज कुठे करायचा हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 

Read  mahadbtmahait gov in | पीक फवारणी यंत्र अनुदान

PM Kusum Yojana अर्ज कोठे करावा?

पीएम कुसुं योजनेतून सौर पंप घेण्यासाठी आपल्याला कोठे अर्ज करावा लागेल हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर चला जाणून घेऊया पीएम कुसुं योजनेअंतर्गत सौर व इतर नूतनीकरणक्षम क्षमता जोडण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र पीएम कुसुं योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला महावितरणच्या mahadiscom.in/solar-pmkusum/index_mr.html

या वेबसाईटला व्हिजिट देऊन आपण अर्ज करू शकता शेतकऱ्यांकडे याकरता जमिनीचा उतारा, पाण्याचा स्त्रोत बँक खाते पासबुक असेल आधार कार्ड आहे ह्या सर्व झेरॉक्स लागणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतः दहा टक्के खर्च सुद्धा करावा लागणार आहे एस सी आणि एसटीच्या शेतकऱ्यांकरिता पाच टक्के खर्च करावा लागणार आहे. जलसंधारण विभाग व जलसंपदा विभागाचे पाणी उपलब्ध के बद्दल पत्र आवश्यक असणार आहे.

Bandist Shelipalan Mahiti in Marathi Maharashtra शेळीपालन

PM Kusum Yojana सुरुवात कधी झाली?

कुसुम योजनेची सुरुवात तशी 2018 19 मध्ये झालेली आहे तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केली होती भारतामधील विजेची कमतरता मोसमी पाऊस जलसिंचन सुविधांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देणे योग्य वेळेवर शक्य होत नाही ही अडचण ध्यानात घेतली.

Read  Vanrakshk Bharti Maharashtra Form Date 2022 | वनरक्षक भरती महाराष्ट्र फॉर्म तारीख २०२२ .

केंद्र सरकारने पी एम किसान कुसुम योजना अमलात आणली आणि त्यामुळे या योजनेचा लाभ अठरा-एकोणीस पासून भारतातील लाखो शेतकऱ्यांना होत आहे आपल्यालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वेबसाईटला नक्की व्हिजिट करा आणि तिथे अर्ज करा केंद्र सरकारच्या या योजनेमुळे शेतकरी आपल्या पिकांना सौर पंपा मार्फत पाणी उपलब्ध करून देऊ शकणार आहेत आणि त्यामुळे याचा लाभ लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या वाढीसाठी होणार आहे.

यामुळे शेतकरी आपल्या शेतातील पिकांना पाणी देऊ शकणार आहेत कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत वीस लाख शेतकऱ्यांना सौर पंप यांचे वाटप करण्यात आलेले आहे प्रभू आपकी या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे.

1 हा प्लांट शेतकऱ्यांना आपल्या पडीक जमिनीवर ही घेता येईल.

Read  LIC Recruitment 2023 Apply Online 2023 | एलआयसी महाभरती २०२३.

2. केंद्र सरकार सबसिडीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पाठवणार आहे.

3. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा उपकरण बसण्याकरता दहा टक्के खर्च करावा लागणार आहे.

4. बँक शेतकऱ्यांना तीस टक्के रक्कम कर्ज स्वरूपात देणार आहे.

कुसुम योजने द्वारे शेतकरी आपल्या शेतामध्ये सौर प्लांट बसवणार आहेत. यामुळे शेतकरी आपल्या शेतीला पाणी देऊ शकतील शेतकरी शेतातील सोलर पॅनल द्वारे निर्मित होणारी वीज गावांमध्येही वापरू शकतात. आणि यामुळे शेतकऱ्यांनी केंद्र सरकार या दोघांचाही फायदा होईल कारण विजेची बचत होईल तसेच वीज मुबलक प्रमाणात मोफत मिळेल.

जास्तीची वीज तयार झाल्यास ग्रिड तयार करून शेतकरी ती वीज कंपन्यांना सुद्धा देऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळेल. तुम्हाला PM Kusum Yojana याबद्दल माहिती कशी वाटली नक्की comment करा.

आमच्या अद्भुत मराठी या ब्लॉगला सुद्धा भेट द्या

 

Leave a Comment